Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

१ ऑक्टोबर पासून होणार या बँकांचे “चेक बूक” बंद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/09/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
१ ऑक्टोबर पासून होणार या बँकांचे “चेक बूक” बंद

मुंबई – (प्रतिनिधी) – येत्या 1 ऑक्टोबरपासून तीन बँकांचे चेकबुक आणि एमआयसीआर (MICR) कोड अवैध (Invalid) ठरणार आहे. या बँकांमध्ये ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC), युनायटेड बँक ऑफ इंडिया (United Bank of India) आणि अलाहाबाद बँक (Allahabad Bank) यांचा समावेश आहे.

Take note & apply for your new cheque book through👇

➡️ ATM
➡️ Internet Banking
➡️ PNB One
➡️ Branch pic.twitter.com/OEmRM1x6j0

— Punjab National Bank (@pnbindia) September 8, 2021
पंजाब नॅशनल बँकेने सोशल मीडियाद्वारे सांगितले की, “ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाची जुनी चेक बुक 1 ऑक्टोबर 2021 पासून बंद होतील. कृपया दोन्ही बँकांची जुनी चेकबुक पंजाब नॅशनल बँकेच्या नवीन चेक बुकसह बदलून घ्यावे. पंजाब नॅशनल बँकेने म्हटले आहे की नवीन चेक बुकसाठी एटीएम, इंटरनेट बँकिंग किंवा पीएनबी वन द्वारे अर्ज केला जाऊ शकतो.

1 एप्रिल 2020 रोजी ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाचे पंजाब नॅशनल बँकेत (PNB) विलीनीकरण झाले आहे. आता ग्राहकापासून दोन्ही बँकांच्या शाखेपर्यंत सर्वकाही पीएनबीचे आहे. तर अलाहाबाद बँक इंडियन बँकेत विलीन झाली आहे. हे विलीनीकरण 1 एप्रिल 2020 पासून लागू झाले आहे.

इंडियन बँकेने अलीकडेच एका ट्वीटमध्ये माहिती दिली होती की, अलाहाबाद बँकेचे पूर्वीचे MICR कोड आणि चेकबुक 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वैध असतील. कोणत्याही व्यत्ययाशिवाय बँकिंग व्यवहार सुरू ठेवण्यासाठी, ग्राहकांनी 1 ऑक्टोबर 2021 पूर्वी नवीन चेक बुक घ्यावे.

इंडियन बँकेच्या मते, ग्राहक जवळच्या शाखेतून नवीन चेकबुक मिळवू शकतात. या व्यतिरिक्त, आपण इंटरनेट बँकिंग (Inernet Banking) किंवा मोबाईल बँकिंग (Mobile Banking) द्वारे देखील अर्ज करू शकता.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

माळी समाजाच्या वतीने गिरीश बच्छाव यांचा सन्मान

Next Post

बाप्पा विथ सेल्फी!यशस्वी व मनस्वी यांनी आपल्या लाडक्या बाप्पासाठी कागदी पुठ्ठयापासून तयार केली मनमोहक आरास

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo