Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

२० टक्के राजकारण ८० टक्के समाजकारण आणि विकास हेच माझे व्हिजन: अमोल जावळे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/11/2024
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
२० टक्के राजकारण ८० टक्के समाजकारण आणि विकास हेच माझे व्हिजन: अमोल जावळे

यावल – (प्रतिनिधी) – मी ज्या ज्या गावांमध्ये प्रचारासाठी जात आहे, त्या त्या ठिकाणी युवक, माता-भगिनी, तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्याशी संवाद साधत असताना, मला प्रकर्षाने जाणवले की, आमच्या मतदारसंघाचा विकास गेल्या पाच वर्षांत हरवून गेला आहे. तो नेमका कुठे गेला, हेच समजत नाही. गेल्यावेळी केलेली चूक या निवडणुकीत दुरुस्त करण्याची जनतेची तयारी आहे, हे स्पष्ट दिसत आहे.आज हरिभाऊ जावळे आपल्यात नाहीत, याचे दुःख आणि खंत आम्हाला आहे. पण आम्ही आपल्याला कधीही वाऱ्यावर सोडणार नाही, याची हमी देतो. मतदारांनी मला विश्वास दिला आहे की, त्यांच्या विजयाने हरिभाऊंची उणीव भरून निघेल. जनतेच्या या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळे मी खूप भारावून गेलो आहे. याच आधारावर, माझ्या विजयाबद्दल मला कोणतीही शंका उरलेली नाही, असे आत्मविश्वासपूर्ण विचार महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांनी व्यक्त केले.

आज अमोल जावळे यांनी सांगवी, अट्रावल, भोरटेक, वनोली, कोसगाव, पिळोदा, म्हैसवाडी आदी भागात भेटी देत मतदारांशी संवाद साधला आणि विजयासाठी समर्थन मागितले. या संवादादरम्यान, अमोल जावळे म्हणाले, “माझा उद्देश केवळ राजकारण करणे नाही, तर 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण ही माझ्या कामाची भूमिका असेल. समाजातील उपेक्षित, वंचित आणि विकासापासून दूर असलेल्या घटकांचा विकास हेच माझे प्राथमिक उद्दिष्ट असेल.” ते पुढे म्हणाले, “मला विकासाचे स्पष्ट व्हिजन राबवायचे आहे. जनतेच्या आशीर्वादाने माझा विजय आणि राज्यात पुन्हा येणारे महायुतीचे सरकार यामुळे रावेर मतदारसंघात येत्या पाच वर्षांत विकासाची गंगा वाहणार आहे. माझ्याकडे कामासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे समाधान होणे, यातच मी माझ्या जीवनाचे सार्थक मानतो.” मतदारांकडून मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे आणि पाठिंब्यामुळे अमोल जावळे यांनी मतदारांचे आभार मानत त्यांच्याशी दृढ नाते प्रस्थापित करण्याचा विश्वास व्यक्त केला.

या प्रसंगी हिरालाल चौधरी, हर्षल पाटील, उमेश पाटील, सविता भालेराव, जयश्री चौधरी, पुरोजित चौधरी, सागर कोळी, योगराज बऱ्हाटे, शाम महाजन, भरत पाटील, राकेश फेगडे, नितीन चौधरी, किरण महाजन, हरीश चौधरी, हरीश कोळी, हरीश कोळी यांसह महायुतीचे पदाधिकारी, बूथ प्रमुख, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मुंबई क्रिकेट असोसिएशन आयोजित कॉर्पोरेट स्पर्धेत जैन इरिगेशनचा दणदणीत विजय

Next Post

महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांना रावेर धनगर समाजाचा जाहीर पाठिंबा

Next Post
महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांना रावेर धनगर समाजाचा जाहीर पाठिंबा

महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांना रावेर धनगर समाजाचा जाहीर पाठिंबा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo