Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

७५.७१ कोटींच्या बनावट देयकाप्रकरणी एकास अटक

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/09/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

मे. बालाजी स्टील आस्थापनासाठी बोगस पाच कंपन्याची स्थापना करुन 75.71 कोटींची बनावट बीले घेतल्याप्रकरणी महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कारवाई करुन एकास अटक केली. भंवरलाल गेहलोत (45) असे अटक केलेल्याचे नाव असून महानगर दंडाधिकारी न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

बनावट देयक देणाऱ्या करदात्यांवरील विशेष मोहिमेअंतर्गत मे. बालाजी स्टील या आस्थापनास महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने भेट दिली. त्यादरम्यान मे. बालाजी स्टीलचे पाच मोठे पुरवठादार मे. द्वारकेश ट्रेडर्स, मे. एस. के. एंटरप्रायझेस, मे. परमार एंटरप्रायझेस, मे. अलंकार ट्रेडिंग आणि मे. शुभ ट्रेडर्स हे बोगस असून गेहलोत यांनी बनावट कागदपत्रांद्वारे त्यांची नोंदणी केली असल्याचे आढळले. वरील पाच बनावट कंपन्यांकडून 11.55 कोटींची बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवत बालाजी स्टीलने प्रत्यक्षात मालाची खरेदी न करता 75.71 कोटी रुपयांची केवळ देयके घेतली आहेत. असे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

श्रीमती वन्मथी सी, राज्य कर सहआयुक्त, अन्वेषण – ब, मुंबई राज्यकर उपायुक्त मनाली पोहोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य कर विभागाचे सहायक आयुक्त महेंद्र पवार, प्रसाद आडके, सायली धोंगडे, दिनेश भास्कर, तसेच राज्य कर निरिक्षक व कर सहायक यांच्या मदतीने ही कारवाई पार पडल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्हा-परिषदेतील तत्कालीन शिक्षणाधिकारी भास्कर जगन्नाथ पाटील यांना अपहार व फसवणूक प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर

Next Post

महात्मा गांधीजींची ती सायकल आता गांधीतीर्थमध्ये!

Next Post

महात्मा गांधीजींची ती सायकल आता गांधीतीर्थमध्ये!

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo