Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ॲड. मुकुंदराव जाधव यांच्या काव्यसंग्रहाला वसुनंदिनी राष्ट्रीय पुरस्कार

राज्यस्तरीय साहित्य रत्न सन्मान पुरस्कारानेदेखील सन्मान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/04/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
ॲड. मुकुंदराव जाधव यांच्या काव्यसंग्रहाला वसुनंदिनी राष्ट्रीय पुरस्कार

जळगाव (प्रतिनिधी) : जामनेर येथील वसुनंदिनी फाऊंडेशनतर्फे कवी-गझलकार ॲड. मुकुंदराव जाधव यांच्या “मनाच्या नजरेतून..” या काव्यसंग्रहाला “वसुनंदिनी राष्ट्रीय उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार” प्रदान करण्यात आला. तसेच त्यांनी केलेले साहित्य लेखन आणि त्यासाठी घेतलेले अथक परिश्रम याची दखल घेऊन वसुनंदिनी फाऊंडेशनचा राज्यस्तरीय साहित्य रत्न सन्मान पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला.

राज्यभरातून कवी-लेखक यांना स्वलिखित कथा, कादंबरी, कविता-संग्रह प्रकाशित झालेले साहित्य निवड करण्यासाठी मागविण्यात आले होते. निवड झालेल्या साहित्यिकांना पुरस्कार देण्याचे पूर्व सूचित केले होते. जळगांव येथिल कवी- ॲड. मुकुंदराव जाधव यांच्या “मनाच्या नजरेतून…” काव्यसंग्रहाची वसुनंदिनी राष्ट्रीय उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. जळगांव येथे झालेल्या कवीसंमेलनात उद्घाटक स्वाती आफळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ. मीना श्रीवास्तव, प्रमुख उपस्थिती प्रमोद कुलकर्णी, प्रमुख पाहुण्या सुलक्ष्मी बाळगीं, डाॅ. विद्या डागा, वसुनंदिनी फाऊंडेशनचे अध्यक्ष विद्याधर सोनवणे, सचिव माधुरी कुलकर्णी या मान्यवरांचे हस्ते ॲड. मुकुंदराव जाधव यांना वरील दोन्ही पुरस्कार प्रदान करण्यात आलेत.

सन २००० पासून ॲड. मुकुंदराव जाधव जळगांव जिल्हा व सत्र न्यायालयात वकीली पेशाचे कामकाज करीत आहेत. “मनाच्या नजरेतून…” हा पहिला काव्यसंग्रह आहे. नुकताच त्यांचा “फुलला सुगंध प्रेमाचा…” हा दुसरा काव्यसंग्रह (प्रेम कवितांचा समावेश असलेला) प्रकाशित झालेला आहे. यापुर्वी त्यांना मराठी साहित्य मंडळ, ठाणे यांचा राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तसेच गझल मंथन साहित्य संस्थेतर्फे गझलयात्री -२०२३ हा पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल जळगांव जिल्हा वकील मित्रपरिवारातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आलेले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

दुय्यम निबंधक श्रेणी-१ / मुद्रांक निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर

Next Post

राज्यात गत लोकसभेच्या तुलनेत २ हजार ६४१ मतदान केंद्रांची वाढ

Next Post

राज्यात गत लोकसभेच्या तुलनेत २ हजार ६४१ मतदान केंद्रांची वाढ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo