Tuesday, September 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ॲन्जीओप्लास्टी झालेल्या रुग्णावर म्युकरमायकोसिसची यशस्वी शस्त्रक्रिया

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
ॲन्जीओप्लास्टी झालेल्या रुग्णावर म्युकरमायकोसिसची यशस्वी शस्त्रक्रिया

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पथकाचे यश

जळगाव : फुफुस काम करण्याची क्षमता वाढविण्यासाठी गेल्या आठ वर्षांपूर्वी ॲन्जीओप्लास्टी होवूनसुध्दा केवळ ३८ टक्के फुफुस काम करीत होते. यासह उच्च रक्तदाब असलेल्या एका वयोवृध्दाची म्युकरमायकोसिसची येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मंगळवारी १३ जुलै रोजी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. अतिगंभीर अवस्थेत असलेल्या या रुग्णाच्या शस्त्रक्रियेनंतर अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी भेट घेवून वैद्यकीय पथकाचे अभिनंदन केले.

जळगाव शहरातील अयोध्यानगरातील एका ७० वर्षिय पुरुष रुग्णाच्या ह्रदयाची काम करण्यासाठी क्षमता वाढविण्यासाठी ८ वर्षापूर्वी ॲन्जीओप्लास्टी करण्यात आली होती. तसेच रुग्णाच्या मेंदूला रक्तपुरवठा कमी होत असल्याचा त्राससुध्दा त्याला जडलेला होता. त्यानंतर रुग्णास म्युकरमायकोसिस आजाराची बाधा झाली. उपचारासाठी त्यांना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सी-२ कक्षात उपचारासाठी औषध वैद्यकशास्त्र विभागाचे सहयोगी प्रा. डॉ. विजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठेवण्यात आले. या ठिकाणी रुग्णाच्या आजाराचे निदान झाल्यानंतर औषधोपचार सुरु करण्यात आले. या रुग्णास महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेतून उपचार मोफत करण्यात आले.

वैद्यकीय तपासणीनंतर रुग्णाची शस्त्रक्रिया मंगळवारी करण्यात आली. रुग्णाचे फुफुस ३८ टक्केच काम करण्यात असल्यामुळे रुग्णास भूल देणे अतिजोखमीचे होते. या सर्व परिस्थितीत रुग्णाला मरणाच्या दाढेतून बाहेर काढण्यास वैद्यकीय पथकाच्या टीमला यश आले. दंत शल्य चिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. इम्रान पठाण, डॉ. श्रुती शंखपाळ, कान नाक घसा विभागाचे प्रमुख डॉ. अक्षय सरोदे, डॉ. हितेंद्र राऊत यांच्यासह सूक्ष्मजीव शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. किशोर इंगोले, बधिरिकरण शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संदीप पटेल, डॉ. अनिल पाटील, डॉ. काजल साळुंखे, डॉ. सचिन पाटील, डॉ. स्वप्निल इंकणे, शल्यचिकित्सा विभागाचे डॉ. उमेश जाधव यांनी महिलेवर शस्त्रक्रिया करण्याकामी परिश्रम घेतले. यासह वार्ड इन्चार्ज परिचारिका नीला जोशी, जोस्त्ना निंबाळकर, निशा गाढे, कविता राणे, ओटी असिस्टंट जितेंद्र साबळे, किशोर चांगरे, जतीम चांगरे, विजय बागुल, विवेक मराठे आदींनी उपचार करण्याकामी परिश्रम घेतले.

अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सदर वैद्यकीय पथकाचे कौतुक केले. यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाचे आभार मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भारतीय डाक विभागात डाक जीवन विमा योजनेसाठी भरती

Next Post

कोणत्याही भागात अडकलेल्या स्थलांतरीत मंजूरांनी त्यांची माहिती तहसील कार्यालयात देण्याचे आवाहन

Next Post

कोणत्याही भागात अडकलेल्या स्थलांतरीत मंजूरांनी त्यांची माहिती तहसील कार्यालयात देण्याचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

आंतर जिल्हा १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड चाचणी

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo