Sunday, June 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शहरातील डॉक्टरांच्या समस्या सोडवण्याकरता कटिबद्ध;मनसे उमेदवार डॉ.अनुज पाटील

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/11/2024
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
शहरातील डॉक्टरांच्या समस्या सोडवण्याकरता कटिबद्ध;मनसे उमेदवार डॉ.अनुज पाटील

जळगांव- शहरातील सर्व मान्यवर डॉक्टरांची बैठक आयएमए हॉल या ठिकाणी पार पडली. बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार डॉ. पाटील यांनी निवडणूक लढण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली व डॉक्टरांच्या येणाऱ्या सर्व प्रकारच्या समस्यांचा समाधान करण्याकरता माझी उमेदवारी आहे असे आश्वासन दिले.

डॉ. अनुज पाटील असे म्हटले की,
तुमच्या समस्या ऐकण्यासाठी, तुमच्या व्यथा समजून घेण्यासाठी मी, डॉ. अनुज पाटील, तुमच्यासमोर उभा आहे. आज डॉक्टरांवर संकटाचं सावट पसरलं आहे. डॉक्टरांवर होणारे हल्ले, रुग्णालयांवर होणारे हल्ले, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून होणारा त्रास, महापालिका प्रशासनातील अग्निशमन दलातर्फे होणारा त्रास, शासनाच्या किचकट नियम व अटी यामुळे रुग्णालय चालवणे अतिशय जिकरीचे काम झाले आहे. परंतु, हे संकट आपण एकजुटीने पार करू शकतो, त्यासाठी आपण एकत्र येण्याची गरज आहे व आपल्या हक्काचा प्रतिनिधी विधानसभेत गेला पाहिजे अशी आग्रही भूमिका ही डॉ. पाटील यांनी मांडली.

डॉक्टरांच्या समस्या विधानसभे मधे मांडण्यासाठी माझं वचन असेल आणि माझ्या प्रत्येक कृतीत तुमच्यासाठी दिलेला शब्द असेल. तुमच्या प्रत्येक व्यथा, तुमच्या समस्यांचा अंतिम निकाल लावण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झेंड्याखाली एक नविन परिवर्तन आणण्याचा निर्धार मी केला आहे.

तुमच्या कष्टाचं मोल, तुमच्या सेवेला सलाम, आणि या लढाईला माझ्या पूर्ण ताकदीने साथ देणार आहे. चला, आता जळगावातील डॉक्टरांच्या स्वाभिमानासाठी उभे राहूयात. तुमचं असलेलं विश्वास मला बळ देईल आणि हा विश्वास तुमच्या प्रत्येक समस्येचं समाधान बनून परत येईल असेही
डॉ. अनुज पाटील यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले

एक नविन जळगाव,
एक निर्धार डॉक्टरांसाठी..!

या घोषवाक्य प्रमाणे माझे प्रयत्न माझ्या व्यवसाय बंधू करता सतत असतील अशी काही डॉ. अनुज पाटील यांनी या प्रसंगी दिली.
या प्रसंगी आय एम ए चे अध्यक्ष डॉ.
सुनील गाजरे,सचिव डॉ अनिता भोळे,डॉ.अनिल पाटील,डॉ विलास भोळे,डॉ.स्नेहल फेगडे ,डॉ.सुनील नाहटा,डॉ.राजेश पाटील,डॉ.जितेंद्र कोल्हे,डॉ.सुदर्शन नवाल,डॉ.अजय सोनवणे,डॉ.अभिजित पाटील,डॉ.नरेंद्र भोळे,डॉ.लीना पाटील यांच्यासह शंभर डॉक्टर उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आ.किशोरआप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ महारॅलीतून कार्यकर्त्यांचा विजयाचा संकल्प

Next Post

डॉ.अश्विन सोनवणे यांनी घेतला माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचा आशीर्वाद

Next Post
डॉ.अश्विन सोनवणे यांनी घेतला माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचा आशीर्वाद

डॉ.अश्विन सोनवणे यांनी घेतला माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचा आशीर्वाद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo