Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/07/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read

नीरव मोदीला ७ हजार कोटी परत देण्याचे आदेश

पंजाब नॅशनल बँकेत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याला पुण्याच्या कर्ज वसुली न्यायाधीकरणाने (डीआरटी) जोरदार दणका दिला आहे. पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी पीएनबी बँकेला ७३०० कोटी रुपये व्याजासह परत करण्याचे आदेश न्यायाधीकरणाने मोदीला दिले आहेत. नीरव मोदी प्रकरणातील हा भारतातला पहिलाच निकाल आहे.

पुणे: पंजाब नॅशनल बँकेत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याला पुण्याच्या कर्ज वसुली न्यायाधीकरणाने (डीआरटी) जोरदार दणका दिला आहे. पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी पीएनबी बँकेला ७३०० कोटी रुपये व्याजासह परत करण्याचे आदेश न्यायाधीकरणाने मोदीला दिले आहेत. नीरव मोदी प्रकरणातील हा भारतातला पहिलाच निकाल आहे. 

नीरव मोदी व त्याच्या कुटुंबीयांनी पंजाब नॅशनल बँकेच्या काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून बनावट लेटर ऑफ क्रेडिटच्या माध्यमातून तब्बल १३ हजार कोटींचा गैरव्यवहार केला. त्यानंतर नीरव मोदी कुटुंबासह देशाबाहेर पळून गेला. त्यामुळे कर्जवसुलीसाठी बँकेने ‘डीआरटी’कडे धाव घेतली. मात्र, मुंबईतील ‘डीआरटी’मध्ये न्यायाधीशांचे पद रिक्त असल्याने हा दावा पुण्यातील ‘डीआरटी’कडे (डीआरटी वन) वर्ग करण्यात आला. बँकेने सात हजार कोटी रुपयांचा एक, तीनशे कोटी रुपयांचा एक आणि १७०० कोटी रुपयांचा एक असे तीन दावे दाखल केले आहेत. त्यापैकी दोन दाव्यांचा निकाल आज देण्यात आला असून कोर्टाने मोदीला हे आदेश दिले आहेत. 

कसा झाला गैरव्यवहार ?

हिरे व्यापारी नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेकडून गैरप्रकारे लेटर्स ऑफ अंडरटेकिंग घेऊन अन्य बँकांकडून कर्जे उचलली होती. त्याद्वारे केलेला गैरव्यवहार ११,४०० कोटींच्या आसपास आहे. तर एकूण गैरव्यवहार १३ हजार कोटींच्या घरात आहे. नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील शाखेतील काही अधिकाऱ्यांशी संगनमत साधून आपल्या परदेशातील हिरे व्यवहारांसाठी सुमारे १५० ‘लेटर ऑफ अंडरटेकिंग’ घेतली. त्याची नोंद बँकेच्या अधिकृत प्रणालीमध्ये केली नाही. बँकेने मोदी व त्याच्या कंपनीला ही ‘एलओयू’ दिल्याने बँकच नीरव मोदी व त्याच्या कंपनीने परदेशातून घेतलेल्या कर्जासाठी हमीदार राहिली. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर बँकेने त्याची माहिती तपास यंत्रणा व शेअर बाजाराला दिली. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

Next Post

छत्तीसगड: पोलीस चकमकीत ४ नक्षल्यांचा खात्मा

Next Post
छत्तीसगड: पोलीस चकमकीत ४ नक्षल्यांचा खात्मा

छत्तीसगड: पोलीस चकमकीत ४ नक्षल्यांचा खात्मा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo