<
विरोदा(किरण पाटील)- जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी शासन व प्रशासन कसोटीचे प्रयत्न करत आहे .कोरोना विषाणू संसर्ग व प्रादुर्भाव थांबवण्यासाठी लॉक डाऊन असल्याने सर्वांचीच आर्थिक घडी विस्कटली आहे. अशा संकटाच्या वेळी मदतीचे हातही पुढे येत आहेत. या संकटाला मात करण्यासाठी एक खारीचा वाटा म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी श्री.लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था, फैजपूर तर्फे ३१००० रुपयांची मदत करण्यात आली आहे. या मदतीचा धनादेश फैजपूर प्रताधिकार डॉ.अजित थोरबोले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी सदर धनादेश देतांना श्री.लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था, फैजपूर चे चेअरम नरेंद्र नारखेडे व्हा.चेअरमन मनोजकुमार पाटील, संचालक अनिल नारखेडे, नीलकंठ सराफ, भास्कर नारखेडे, व्यवस्थापक जयश्री चौधरी, मनोज वायकोळे, राजेंद्र मानेकर, चंद्रकांत पाटील, शेखर चौधरी यांची उपस्थिती होती. संस्थेने सतत सामाजिक उपक्रम राबविले आहेत. सर्व संचालक मंडळाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपायांना मदतीसाठी शासनास ३१००० रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला. यापुढेही लोकहितासाठी आवश्यक ती सर्व प्रकारची मदत श्री.लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था, फैजपूर करीत आहे व पुढेही करेल अशी ग्वाही संस्थेचे चेअरमन नरेंद्र नारखेडे व व्हा.चेअरमन मनोजकुमार पाटील यांनी म्हटले आहे.