<
पारोळा-(प्रतिनिधी) – येथील जेडीसीसी बँकेच्या बहादरपूर शाखेत जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील यांनी भेट दिली असता, सदर बॅंकेची इंटरनेट सेवा बंद असल्याने सर्व आर्थिक व्यवहार ठंप असल्याचे त्यांनी सांगितले. या बँकेच्या शाखेला बहादरपूर, शिसोदे, महापूर, इंदवे, जिराळी, वडगांव, भोलाणे, पिंपळकोठे, वसंतनगर अशी एकूण १३ गावे जोडलेली आहेत. एवढ्या गावांचे व्यवहार असणाऱ्या बँकेची ही स्थिती म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार शेतकर्यांना सहन करावा लागत आहे.
शिवराम पाटील यांनी सांगितले की माझे शेती बाबत व्यवहार म्हणून बोंडळीची नुकसानभरपाई त्यात आल्याची माहिती मिळाली होती, त्यामुळे मी आज सोमवारी २ वाजता बॅंकेत गेलो होतो पंरतु बँकेचे ग्राहक म्हणजे शेतकरी परत जात असल्याचे दिसून आले. येथील शाखा व्यवस्थापक यांना याबाबत विचारले असता, शाखा व्यवस्थापक विजय दगडू हटकर यांनी सांगितले कि कालपासून बीएसएनएल चे इंटरनेट कनेक्शन बंद आहे. बीएसएनएल ने वीज बील भरले नाही, म्हणून ही अडचण निर्माण झालेली आहे. असे कारण सांगितले.
डिव्हीजनल ऑफिसर श्री सुभाष गुमान पाटील हे पारोळा येथे होते. त्यांचेशी फोनवर बोललो असता,त्यांनी कालपासून या अडचणीला दुजोरा दिला.
आमच्या बँकेने बीएसएनएल ऐवजी जिओ चे इंटरनेट कनेक्शन मागणी केली आहे पण चेअरमन व संचालक लक्ष देत नाहीत.अशी लाजतमुरडत तक्रार केली.
संचालक यांना याबाबत तक्रार केली असता,बघू फोन लावते,असे सांगितले.
सध्या भाजप व शिवसेने कडून विविध यात्रा काढण्यात येत आहेत पण अडचणित आलेले शेतकरी काय आशिर्वाद देतील? कारण शेतकर्यांच्या समस्या जैसे थे दिसत आहे. मंत्री कशासाठी व्हायचे आहे?शेतकरी हितासाठी कि फक्त सत्ता चाखण्यासाठी? असा देखील खडा सवाल त्यांनी सत्ताधारी पदाधिकाऱ्यांना सोशल मिडियावर केलाा आहे .
शासनाने इंटरनेट च्या बहाण्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत आणले असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. शेतकरी आत्महत्या करण्यास सरकाची यंत्रणा जबाबदार आहे. हे यातून पुन्हा उघडकीस आल्याचे सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील यांनी सांगितले.