<
जळगांव(प्रतिनिधी)- शासनाकडून होणाऱ्या धान्य वाटपासाठी ज्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे अश्या विनाअनुदानित, नैसर्गिक वाढीव तुकड्यावर काम करीत असणारे तसेच इतर काही कारणास्तव ज्या शिक्षकांना अद्याप शासनाकडून वेतन दिले जात नाही आहे अश्या शिक्षकांना विमा कवच देण्यात यावा व त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी शासनाने पुर्णतः स्वीकारावी. त्याच प्रमाणे काही भाग सील केला असल्यामुळे त्या ठिकाणी राहणारे शिक्षक घरा बाहेर निघू शकत नाही आणि काहींना येण्या जाण्यासाठी निर्माण होणाऱ्या समस्येकडे ही शासनाने लक्ष घालावे. परिस्थिती गंभीर आहे शिक्षक त्यांचे कर्तव्य बजावणार यात काही शंकाच नाही परंतु शासनाने देखील अश्या शिक्षकांचा व त्यांच्या कुटुंबाचा सकारात्मक विचार करावा, तसेच विनाअनुदानित शिक्षकांना प्रचलित नियमानुसार अनुदान देणे अशी मागणी व विनंती महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मनीष गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य प्रसिद्धी प्रमुख नवीन अरुण नेमाडे तसेच जळगांव जिल्हाध्यक्ष गौरव सुभाष भोळे व शाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य प्रसिध्दी प्रमुख किशोर घुले यांच्या द्वारा करण्यात आली आहे.