<
जळगाव, दि. 29 (जिमाका) – जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक/विधवा पत्नी यांना कळविण्यात येते की, सैनिकी मुलां/मुलींचे वसतिगृह, सैनिक विश्रामगृह व सभागृह, जळगाव व रावेर येथील अशासकीय कर्मचाऱ्यांच्या पुर्ननियुक्ती नविन भरती करण्याचे प्रस्तावीत असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी वामन कदम यांनी कळविले आहे.
रिक्त पदांचा तपशील सैनिकी मुलांचे वसतिगृह, जळगाव :- वसतिगृह अधिक्षक-01 पद (पुरुष) जेसीओ- मानधन रुपये 12872/-, सहाय्यक वसतिगृह अधिक्षक-01 पद (पुरुष), हवालदार-मानधन-9902/-, पहारेकरी-01 पद (पुरुष), मानधन -8911/-, स्वयंपाकी-03 पदे (महिला), मानधन -5941/-, सफाई कर्मचारी-01 पद (पुरुष), मानधन-5658/- असे आहे.
सैनिकी मुलींचे वसतिगृह, जळगाव :- वसतिगृह अधिक्षिका-01 पद (महिला), युद्धविधवा, विधवा- मानधन -12872/-, सहाय्यक वसतिगृह अधिक्षिका -01 पद (महिला), युद्धविधवा, विधवा- मानधन-9902/-, पहारेकरी-01 पद (पुरुष), मानधन-8911/-, स्वयंपाकी-02 पदे (महिला), युद्धविधवा, विधवा-मानधन -5941/-, सफाई कर्मचारी-01 पद (महिला), युद्धविधवा, विधवा-मानधन-5658/- असे आहे.
सैनिकी विश्रामगृह व बहुउद्देशिय सभागृह, जळगाव :- व्यवस्थापक-01 पद (पुरुष) जेसीओ- मानधन-9902/-, पहारेकरी-01 पद (पुरुष), मानधन-8911/-,सफाई कर्मचारी-01 पद (पुरुष),मानधन-5658/- असे आहे.
सैनिकी बहुउद्देशिय सभागृह, रावेर:- व्यवस्थापक-01 पद (पुरुष) जेसीओ-मानधन -9902/-,पहारेकरी- 01 पद (पुरुष), मानधन-8911/-, सफाई कर्मचारी-01 पद (पुरुष),मानधन-5658/- असे आहे.
तरी इच्छुक व पात्र माजी सैनिक, विधवा पत्नी यांनी दिनांक 15 मे, 2020 पर्यंत आपले अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव येथे सादर करावेत. तसेच अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक 0257-2241414 वर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव श्री. कदम यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.