Thursday, July 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कापुस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या निर्मुलनासाठी कृषि विभागाचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कापुस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या निर्मुलनासाठी कृषि विभागाचे आवाहन


जळगाव, दि. 29 (जिमाका) – कापुस हे जळगाव जिल्ह्याचे मुख्य नगदी पीक असुन कापुस पिकाचे सर्वसधारण पेरणी क्षेत्र 5 लाख 10 हजार 911 हेक्टर इतके आहे. चालु हंगाम सन 2020-21 या वर्षात जिल्ह्याचे एकुण खरीप हंगाम लागवडीचे क्षेत्रापैकी सुमारे 67 टक्के म्हणजेच 5 लाख 25 हजार हेक्टर क्षेत्रावर कापुस पिकाची लागवड करण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यात 11 हजार 884 क्विंटल कापुस बियाणे विक्री होईल. मागील वर्षाचा अनुभव पाहता गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र रोखण्यासाठी या खरीप हंगामात सुध्दा व्यवस्थापनाच्या उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे कृषि विभागामार्फत कळविण्यात आले आहे.


शेवटच्या वेचणीनंतर शेतातील प-हाटयांचे श्रेडर, रोटाव्हेटरसारख्या यंत्राव्दारे लहान तुकडे करुन शेतात गाडणे किंवा त्यांचा वापर शेताबाहेर कंपोस्ट तयार करण्यासाठी करावा. उन्हाळ्यामध्ये (एप्रिल-मे महिन्यात) जमिनीची खोल नांगरट करणे. कापुस पिकाची पुर्वहंगामी (मे मधील) लागवड टाळणे, गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध संकरीत वाणांची लागवड न करता गावनिहाय एकाच वाणाची व एकाच वेळी लागवड करणे.
शिफारस केलेल्या कमी कालावधीत पक्व होणा-या बीटी कापुस अथवा सरळ वाणांची वेळेतच म्हणजे जून महिन्यात जमिनीत पुरेसा ओलावा आल्यानंतर पेरणी करणे. किडीच्या जीवनक्रमात अडथळा निर्माण करण्यासाठी पिकांची फेरपालट करणे, कपाशीच्या सभोवती नॉनबीटी (रेफ्युजी) कपाशीची लागवड करणे, नत्र खताचा वापर जास्त झाल्यास पिकाची कायिक वाढ होऊन गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढतो. म्हणून जास्तीच्या नत्र खताचा वापर न करता मृद परिक्षण करुन त्याच्या आधारावर खतांच्या मात्रेचा अवलंब करणे, जिल्ह्यातील जिनींग मिल्समध्ये फेरोमन सापळे लावून मास ट्रॅपिंग करणे, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव श्री संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

माझ्याविरुद्धचा हा राजकीय कट : नगरसेवक कुलभूषण पाटील

Next Post

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील रिक्तपदे मानधनावर भरण्यात येणार

Next Post

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील रिक्तपदे मानधनावर भरण्यात येणार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

भूकरमापक १५ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

भूकरमापक १५ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून जमिनीचा पोत जपा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून जमिनीचा पोत जपा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतकरी कर्जमुक्तीचा राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतकरी कर्जमुक्तीचा राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo