कळंब , तालुका प्रतिनिधी(हर्षवर्धन मडके)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कळंब तालुक्यातील एकुरका येथे मनसे तालुका सचिव गोपाळ घोगरे यांच्याकडून गरजूंना १५ जीवनावश्यक खाद्यपदार्थांच्या किट देण्यात आल्या. या मध्ये १०० किलो गहू , १०० किलो तांदूळ , २० तेल पुडे, २० किलो शेंगदाणे , तसेच मीठ , मसाला आणि हळद पुडे इ जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. कोरोना मुळे उत्पन्न झालेल्या परिस्थितीचा आढावा घेवून मनसे ने पुढाकार घेतला या मिळालेल्या मदतीमुळे त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य बघण्यासारखे होते.गोपाळ घोगरे यांना त्यांच्या आई वडिलांचेही सहकार्य लाभले, घोगरे यांनी आई- वडिलांचे आभार मानले.
यावेळी मंडळ अधिकारी अनिल अहिरे, मनसे तालुका सचिव गोपाळ घोगरे , मनसे सर्कल प्रमुख गणेश घोगरे , मनसे शाखाध्यक्ष गणेश खोत , मनसे सैनिक विनोद गिरी , माजी पंचायत समिती सदस्य राजेभाऊ भिसे , तलाठी कार्यालय कर्मचारी गणेश गिरी, ज्येष्ठ नागरिक बिभीषण घोगरे , अंगद गिरी , बाळासाहेब निकम इ. उपस्थित होते