जळगाव-(जिमाका) – येथील कोविड रूग्णालयात स्वॅब घेतलेल्या 34 कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज दुपारी नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 32 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर दोन व्यक्तीचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.
या दोन व्यक्तीमध्ये एक 24 वर्षीय तरूण हा मारूतीपेठ, जळगाव येथील असून दुसरी व्यक्ती 21 वर्षीय महिला ही चिचोंल, ता. बाळापूर, जि अकोला येथील असून ती समतानगर जळगाव येथे राहत होती.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 45 इतकी झाली आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने दिली आहे
Give daily news
Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/Lw2u56VssJL4RyhdXtSagd