कळंब , तालुका प्रतिनिधी(हर्षवर्धन मडके)
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अद्याप कोरोणाचा एकही रुग्ण नसला तरी उस्मानाबाद जिह्याशेजारी सोलापूर जिल्ह्यातील कोरोणाच्या वाढत्या रुग्ण संख्येवरून जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे यांनी कठोर निर्णय घेत ३ मे रोजी १ दिवसाचा जनता कर्फ्यु घोषित केला आहे.
तरी सर्व आस्थापना बंद राहतील , तसेच सर्वांनी घरीच थांबायचे कोणीही बाहेर यायचे असेही जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे यांनी सांगितले.