Thursday, August 14, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शांताराम कुंजीर म्हणजे लढवय्या,निर्भीड, संघर्षशील नेता-श्रीमंत कोकाटे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
शांताराम कुंजीर म्हणजे लढवय्या,निर्भीड, संघर्षशील नेता-श्रीमंत कोकाटे

दि ४ मे च्या रात्री १२ वाजता शांताराम कुंजीर यांचे हृदयविकाराने दुःखद निधन झाले.ही घटना अत्यंत दुःखदायक आहे.कारण अत्यंत उमेदीच्या काळात असे घडणे हे सर्वांसाठी धक्कादायक आहे. शांताराम कुंजीर म्हणजे संघर्ष!अगदी बालवयापासून त्यांनी संघर्ष केला. अन्याय आणि प्रतिकूल परिस्थितीशी झगडणे हा त्यांचा पिंड होता. हक्कासाठी लढणे हा त्यांचा स्थायीभाव होता. भीती त्यांना माहीत नव्हती.मराठा समाजातील उपेक्षित वर्गासाठी त्यांनी प्रदीर्घ संघर्ष केला. शांताराम कुंजीर आणि प्रवीण गायकवाड म्हणजे महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील धनाजी-संताजीची जोडी! मराठा महासंघाचे आण्णासाहेब पाटील, शशिकांत पवार, बामसेफचे वामन मेश्राम साहेब, मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्या सोबत कुंजीर साहेबांनी कार्य केले. सुरुवातीच्या काळात ते शिवसेनेत सक्रिय होते. शांताराम कुंजीर हे वैचारिकदृष्ट्या खूप प्रगल्भ होते. त्यांचे अफाट वाचन होते, ते प्रवाहपतीत नव्हते, त्यामुळेच ते परिवर्तनाच्या लढ्यात उतरले. एका बाजुला सामाजिक लढा तर दुसऱ्या बाजूला जगण्याचा संघर्ष सुरू होता.एका हॉटेलमध्ये मॅनेजर, नंतर तुळशीबागेत दुकान, नंतर हॉटेल सुरू केले. अनेक छोटे मोठे व्यवसाय त्यांनी केले.अपयशाने ते खचून गेले नाहीत. हसत मुखाने संकटाला सामोरे गेले.पण कधी रडगाणे केले नाही. मराठा आरक्षणाच्या लढ्यातील शांताराम कुंजीर हे झुंजार नेते होते. त्यासाठी त्यांनी अनेक लढे दिले. मुख्यमंत्र्याचे हेलिकॉप्टर फोडले, त्यामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला पण ते मागे हटले नाहीत. आज आरक्षण मिळाले आणि ते गेले. छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास विकृत करणाराना त्यांनी धडा शिकवला, तो वैचारिक आणि रस्त्यावरच्या लढाईचा देखील होता. “पती माझे छत्रपती” या नाटकातून “छत्रपती” शब्दाची विडंबना करणारांना त्यांनी नाटकाचे नावं बदलायला भाग पाडले. भांडारकर प्रकरणात ते शिवाद्रोह्यां विरुद्ध लढले. विकृतांविरुद्ध ते अभ्यासू आणि निर्भीडपणे लढले. कार्यकर्त्यांसाठी रात्री अपरात्री धावून जाणे हा त्यांचा पिंड होता. एकदा रात्री वेस्ट ईन हॉटेलसमोर कांही समाजकंटकांनी अडविले, मी कुंजीर साहेबांना फोन केला, दहा मिनिटांत ते आले व कंटक पळून गेले. शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण? हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी ते स्वतः पुढे आले, छपाईसाठी त्यांनी मोलाची मदत केली.ते आम्हा सर्वांचा मोठा आधारवड होता. निरपेक्षपणे काम करत राहणे, ही त्यांची खासियत होती. अनेक प्रसंगी वडा पाव खाऊन त्यांनी कार्य केले.त्यांना गरिबीची आणि गरिबांची मोठी जाणीव होती. त्यांना कर्तृत्वाची घमेंड नव्हती,अहंकार नव्हता, बडेजाव नव्हता. ते समन्वय करायचे. आपापसातील वाद त्यांना आवडत नव्हते. सर्व वयोगटात ते सहज मिसळायचे. आम्ही त्यांच्यासोबत खूप फिरलो. संघटनेसाठी त्यांनी दुचाकी, रेल्वे, एसटी अशा वाहनातून रात्री अपरात्री उपाशीपोटी राहून खूप प्रवास केला,पण त्याचे त्यांनी कधी भांडवल केले नाही. आता त्यांच्याकडे चारचाकी गाडी आली आणि ते गेले, याचे खूप दुःख वाटते.ते येरवाड्यात राहिले.ते चळवळ जगले.छोट्या घरातून ते आता प्रवीणदादांच्या मदतीने मोठ्या फ्लॅटमध्ये आले आणि ते गेले, याचे खूप दुःख वाटते. त्यांनी गरिबीचा कधी संकोच बाळगला नाही, कधी भांडवल केले नाही, चांगले दिवस आले तरी आपला लढाऊ बाणा विसरून ते प्रस्थापित झाले नाहीत.त्यांना सर्वांसाठी सतत लढायला आवडायचे.ते कार्यकर्त्यांना खूप जपायचे. आपल्या सहकार्यांवर खूप प्रेम करायचे.कोणाचा जरी फोन आला तर ते फो घ्यायचे,नाही घेता आला तर परत करायचे.अत्यंत शांतपणे समोरच्याचे म्हणणे ऐकून घ्यायचे.पुरोगामी विचारधारेशी त्यांनी कधी तडजोड केली नाही.ते जितके नम्र होते तितकेच ते बाणेदार होते.अशा कर्तृत्ववान कुंजीर साहेबांचा अकाली मृत्यू धक्कादायक आहे.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना खूप दुःख होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

अजुन ७५ शिव’भोजन थाळी’ पाचोरा शहरात वाढवण्याची उपाशी लोकांची प्रशासनाकडे तातडीची मागणी !

Next Post

पोलीस बँडच्या तालावर कोरोना लढवय्यांना निरोप

Next Post
पोलीस बँडच्या तालावर कोरोना लढवय्यांना निरोप

पोलीस बँडच्या तालावर कोरोना लढवय्यांना निरोप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

बांधकाम कामगार मंडळ माहिती अधिकार कक्षेतच;राज्य माहिती आयुक्तांचा महत्त्वपूर्ण निर्णय

बांधकाम कामगार मंडळ माहिती अधिकार कक्षेतच;राज्य माहिती आयुक्तांचा महत्त्वपूर्ण निर्णय

चिवास महिला मंडळाचे कण्वाश्रमात वृक्षारोपण 

चिवास महिला मंडळाचे कण्वाश्रमात वृक्षारोपण 

प. वि. पाटील विद्यालयात रक्षाबंधन सण उत्साहात साजरा

प. वि. पाटील विद्यालयात रक्षाबंधन सण उत्साहात साजरा

१२ ऑगस्टला जळगावात छत्रपती शिवाजी महाराजांची गाथा मांडणारा ‘इतिहास महाराष्ट्राचा’ उपक्रम;बालरंगभूमी परिषद व वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालय यांचा संयुक्त उपक्रम

१२ ऑगस्टला जळगावात छत्रपती शिवाजी महाराजांची गाथा मांडणारा ‘इतिहास महाराष्ट्राचा’ उपक्रम;बालरंगभूमी परिषद व वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालय यांचा संयुक्त उपक्रम

ॲड. प्रविण रंधे ३६८ मतांनी सदस्यपदी विजयी;जळगाव जिल्हा बार असोसिएशन निवडणुकीत यश

ॲड. प्रविण रंधे ३६८ मतांनी सदस्यपदी विजयी;जळगाव जिल्हा बार असोसिएशन निवडणुकीत यश

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications