<
जळगांव(प्रतिनिधी)- सर्वात श्रेष्ठ, दानात दान अन्नदान. आपण सर्व आपले आयुष्य जगत असताना अनेक गोष्टींचा अंगीकार करतो. कुठेतरी समाजाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आपली अंशतः का होईना धडपड चालू असते. दानाचा विचार त्यातून येतो. आपले जगणे उन्नत होण्यासाठी, समाजातल्या वंचित वर्गाला आपलेसे करण्यासाठी, अश्याच प्रकारे सध्या देशासह राज्यावरील जागतिक संकटामुळे १७ मे पर्यंत लॉकडाउन ठेवण्यात आला आहे.
लॉकडाऊनमुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या, शहरातील गरजू बांधकाम मजूर अश्या अनेक घटकांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने कोरोना पार्श्वभूमीवर कृती फाऊंडेशनच्या वतीने या २५ गरजुंना किराणा किट देत मदतीचा हात देण्यात आला आहे. समाजिक कार्यात नेहमीच भाग घेवून भरीव योगदान देणारे कृती फाउंडेशन लॉकडाउन सुरु झाल्यापासून शहरासह इतर ठिकाणी गरजुंना मदत करताना दिसत आहे, तसेच या बरोबर थोडी आर्थिक मदत करतानाही दिसून येत आहे. हा उपक्रम कृती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत महाजन यांच्या पुढाकाराने घेण्यात आला तसेच या उपक्रमासाठी दत्तात्रय अपस्तंब, लिलाताई भालेराव, अलीम शेख, सुरेश देवरे, किशोर मोहिते, संजय बेल्हेकर, सीमा कोलते यांनी आर्थिक सहकार्य केल तर गरजुंना किराणा वाटप प्रसंगी फाऊंडेशन कार्याध्यक्ष व पोलीस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी, गजानन मोटर्सचे गिरीश नेहते, सत्यमेव जयतेचे संपादक दिपक सपकाळे, जी. टी. महाजन, पत्रकार हर्षल सोनार, चेतन निंबोळकर आदी उपस्थित होते.