<
विरोदा( किरण पाटील)- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे आरोग्य सुरक्षित राहावे यादृष्टीने आरोग्य तपासणी करून महत्त्वाच्या ठिकाणी म्हणजे हॉटस्पॉट भाग, नाकाबंदी या ठिकाणी २४ तास बंदोबस्तावर असणारे पोलीस कर्मचारी यांची बुधवार, दि.६ मे रोजी संजीवनी हॉस्पिटल, फैजपूर व ग्रामीण रुग्णालयाल,यावल यांच्या सहकार्याने फैजपूर पोलीस स्टेशन मध्ये कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. संजीवनी हॉस्पिटल, फैजपूर चे तज्ञ डॉ.दिलीप भटकर (एम.डी. मेडिसीन) व ग्रामीण रुग्णालय यावल चे वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला यांच्या संयुक्त विद्यमानाने हा उपक्रम राबविण्यात आला.
त्यांना मदतनीस म्हणून डॉ.पवार यावल, सचिन भटकर, अशोक सोनवणे, फैजपूर याच्या सहकार्य लाभले. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासन कठोरपणे उपाय योजना करत आहे. यासाठी पोलीस कर्मचारी २४ तास सेवेत असतात. यावेळी त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी फैजपूर पोलीस स्टेशन चे ए.पी.आय. प्रकाश वानखडे सह पोलीस कर्मचारी यांची हृदय विकार, रक्तदाब, मधुमेह, रक्तातील ऑक्साईजन ची मात्र आदी सोशल डिस्टिंग चे पालन करून त्याचबरोबर दैनंदिन आरोग्य व घ्यावयाची काळजी, वजन नियंत्रित ठेवणे इत्यादी विषयावर तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले. अशा सुमारे ३५ जणांची तपासणी करण्यात आली. सुदैवाने तपासणी करण्यात आलेल्या एकाही कर्मचाऱ्यास अतिताप व इतर आजार दिसून आले नाही.