<
जळगाव – (धर्मेश पालवे)-जळगांव जिल्हा हा महाराष्ट्रातील संस्कृतीक,धार्मिक आणि भक्तिभाव असलेला वारसा असलेल्या जिल्ह्यापैकी एक असल्याचं नेहमी बोललं जात असत.यावल चोपडा या महामार्गावर जळगांव पासून ३५ कि. मी. दूर, आणि उत्तरेस असणाऱ्या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी किणगाव आडगाव या गावाच्या उत्तरेस ४ कि. मि. वर जागृत व नवसाला पावणारे, जुना धार्मिक आणि सांस्कृतिक तसेच पर्यटन क्षेत्राचा वारसा लाभणारे मनूदेवी हे एक देव स्थान आहे
.
जळगांव पासून ३५ कि. मी. लांब असणारे हे पर्यटन क्षेत्र अनेक वळण रस्ते, गर्द झाडी, हिरव्यागार डोंगररांगा, मधून विस्तारले आहे.
या ठिकाणी पाहण्याजोगे लहान मोठ्या, नद्या, नाले, हिरवळ, जगलं, आणि ४० फूट लांब उंच सतत वाहणारा धबधबा हा विशेष पाहण्या जोगा आहे. या पर्यटन स्थळाला महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने विशेष पर्यटनाचा दर्जा देऊन, सन २०१७-१८ साली खासदार रक्षा ताई खडसे यांच्या माध्यमातून मंदिर व रस्त्यांचा जिर्णोद्धार करण्यात आला आहे. पर्यटकांना येण्या- जाण्याची, राहण्याची व दर्शन प्रणालीत सुरक्षितता लाभावी म्हणून CCTV, सेक्युरिटी, आणि स्वछता ठेवली गेली आहे.या मंदिराजवळ ४० फूट उंच असणारा आणि डोंगरावरून सतत वाहणारा धबधबा आहे, जो खळखळून येताना पांढरा शुभ्र दुधासारखा वाहतांना दिसत असतो. सतत सात ते आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने जिल्हा चिंब झाला असून बळीराजाही सुखावला आहे. त्यात ३ आँगस्ट पासून सुरू असणाऱ्या श्रावण सरी सोमवार पर्यन्त ही बरसत राहिल्याने शहर व जिल्हा वासीयांना विकेंड सह आनंद द्विगुणित झाल्याचं दिसत आहे. यात पर्यटक म्हणून बाल गोपाल, महिला पुरुष, तरुण तरुणी, आणि भक्तगण भर पावसातही आनंद घ्यायला येत असल्याचे दिसत आहे. आणि जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून नागरिक व विद्यार्थी सहली काढून त्याचा आनंद घेताना दिसून येत आहे. पावसात आरोग्य सह सर्वतोपरी काळजी घेऊन पर्यटन सफल करावं अशी मंदिर व पर्यटन प्रशासनाने सुचवले असून जिल्ह्यातील मनूदेवी हे पर्यटन क्षेत्र आता खूपच विलोभनीय दिसत आहे. जणू मनूदेवी धबधबा पर्यटकांना खुणावतोय म्हणणे वावगे ठरू नये