<
मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली. अजित पवार यांचा गिरीश महाजन यांचं नाव न घेता त्यांना नाच्या असे म्हटले आहे. नाशिकमध्ये पूर आला तरी मंत्री नाचतात. नाच्याचे काम तुमचे मंत्री करतात अशी टीका अजित पवार यांनी केली.
काही गोष्टी अजूनही घडतील, काही लोक थांबतील किंवा आणखी काही लोक सोडून जातील. सगळ्या भागातून आघाडीचे उमेदवार निवडून आले पाहिजेत. आपल्याला राज्यात आघाडीचे सरकार आणायचे आहे. तुमची साथ असेल तर मी कोणाच्या बापाला घाबरत नाही असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच ईव्हीएम नको बॅलेट पेपरचा आग्रह धरा असंही आवाहन अजित पवार यांनी म्हटलं आहे. सोलापुरात ते बोलत होते.
अजित पवार यांनी याआधीही एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. ज्यानंतर त्यांनी त्यासाठी माफी मागितली आणि आत्मक्लेश आंदोलनही केले होते. आता मात्र गिरीश महाजन यांना त्यांनी नाच्या म्हटले आहे. सत्ताधारी पक्षावर टीका करताना त्यांची जीभ पुन्हा एकदा घसरी आहे.
——–
तीन दिवस नाशिक येथे तळ ठोकून होतो -गिरीश महाजन
३७० कलम रद्द झाल्याचा अभिमान ; नाचलो यात गैर काय ?ना. महाजन यांचा अजित पवारांना सवाल
जळगाव -माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्यावर नाच्या म्हणून खालच्या भाषेत टीका केल्याने गिरीश महाजन यांनीही त्यांना सडेतोड उत्तर देत दुष्काळ जेव्हा मागे पडला होता तेव्हा अजित पवार यांनी धरणात पाणी नाही तर मी काय करू … असे वक्तव्य केले होते . ते मी आता सांगत नसून सर्वाना माहिती आहे. पूर परिस्थितीचे मला गांभीर्य आहे. तसेच मी नाशिक येथे महापुराची परिस्थिती असताना कंबरभर , छातीभर पाण्यात फिरून नागरिकांना आवश्यक ती मदत केली . त्यामुळे त्यांनी माझ्याबद्दल काढलेले वक्तव्य चुकीचे आहे. याशिवाय जम्मू काश्मीर मधील कलम ३७० हा कलंक होता . तो रद्द करण्याचे काम नरेंद्र मोदी , अमित शहा यांनी केल्याने प्रत्येक भारतीयाला याचा आनंद झाला . मीदेखील ढोलताशांच्या गजरात नाचून आनन्द व्यक्त केला यात गैर काय आहे असा सवाल ना. गिरीश महाजन यांनी अजित पवार यांना विचारला आहे. नाचलो यात काहीच गैर नसून याचा आम्हला सार्थ अभिमान असल्याचे ना. महाजन यांनी सांगितले.