<
विरोदा(किरण पाटिल)- फैजपूर प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले व वाहन चालक उमेश तळेकर यांच्यावर रावेर येथे तीन फळविक्रेत्यांनी हात उगारला होता. तिघांवर रावेर पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. रावेर येथील झालेल्या घटणेचा जाहीर निषेध व पोलीस संरक्षण देण्याची मागणी फैजपूर भा.ज.पा. शहर अध्यक्ष अनंता नेहेते व त्यांच्या सहकार्यांनी फैजपूर येथील डी.वाय.एस.पी. कार्यालयात निवेदनाद्वारे केले आहे.
यावल-रावेर विभागाचे प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले व त्यांचे वाहन चालक उमेश तळेकर हे शासकीय सुट्टी, उन्हाळा, कोरोनाची भीती, कुटुंब याची कोणत्याही प्रकारची पर्वा न करता केवळ आपल्या उपविभागात कोरोनाचा प्रादुर्भाव होवु नये म्हणून पायाला भिंगरी लाऊन पूर्व- पश्चिम, चोरवड पासून ते चिंचोली पर्यंत आणि उत्तर- दक्षिण, सातपुड्यापासून ते तापीच्या खोऱ्यापर्यंत दोन्ही तालुके पिंजून काढणाऱ्या एका प्रांजळ, कर्तव्यनिष्ट अधिकारी व त्यांचे वाहन चालक यांच्यावर रावेर येथे झालेल्या गैरवर्तणुकीचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. दोन्ही तालुक्यात कोराना पसरू नये व या काळात गोर-गरीब जनतेला जिवनावश्यक सेवा मिळाव्यात यासाठी कर्तव्य बजावित आहेत. अश्या अधिकाऱ्यांना खरोखरच सलाम केला पाहिजे. अश्या अधिकाऱ्यांवर अशी घटना घडणे ही अत्यंत खेदजनक आणि लज्जास्पद बाब आहे. प्राताधिकारी हे यावल-रावेर तालुक्यासाठी इंसीडेंट कमांडर व सर्व प्रशासकीय यंत्रणाचे प्रमुख म्हणून कामकाज करत आहे . सदर घटनेमुळे कर्मचारी आणि अधिकारी वर्गात असंतोष निर्माण होत आहे. फैजपूर प्राताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, असे निवेदन भा.ज.पा. फैजपूर शहराध्यक्ष अनंता नेहेते, भा.ज.पा. शहर सरचिटणीस संजय सराफ, दिपक होले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी दिले आहे.