<
विरोदा(किरण पाटिल)- कोरोना व्हायरसच्या भयंकर अशा पार्श्वभूमीवर तसेच कोरोनाचा वाढता प्रादूरभाव रोखण्यासाठी शासनाने केलेल्या संचारबंदी मुळे अनेक छोट्या कंपन्यांमधील कामगार, मजूर, त्यांची लहान मुले तसेच हातावर पोट असणाऱ्या नागरिकांची सर्वात जास्त बिकट अवस्था झाली आहे.
सर्वसामान्य कुटूंबात महिन्याकाठी येणाऱ्या पगारावर घराचा गाडा चालत असतो त्यामुळे सध्या आवक थांबल्याने या कुटूंबियांना मोठी झळ पोहचली आहे. ही पार्श्ववभूमी लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी ची जाणीव लक्षात ठेवून गरजू नागरिकांना फैजपूर येथील सामाजिक कार्यकर्ते पप्पु मेढे यांची मुलगी कु.प्रणिता पप्पु मेढे हिच्या पहिल्या वाढदिवस व बुध्द पौर्णिमा निमित्त गोर-गरीब व पायी प्रवास करणाऱ्या शेकडो गरजू लोकांना अन्न दान करून आपल्या मुलीचा वाढदिवस व बुध्द पौर्णिमा साजरी केली. या उपक्रमात फैजुरातील बौद्ध पंच ट्रस्टचे अध्यक्ष, भीमराव मेढे, माजी सैनिक भालचंद्र मेढे, वीज वितरण कंपनी चे अभियंता विजय आनंदा तायडे, सामाजिक कार्यकर्ते अजय मेढे, कैलास बालानी, अमर मेढे, बग्गन मेढे, राजनंदन मेढे, लखन मेढे, भुषण मेढे, वैभव मेढे, प्रवीण मेढे, रोहित मेढे, राजु वाघ, मनोज मेढे, विक्की युवराज मेढे, मयुर मेढे, चेतन मेढे, योगेश मेढे, सुमित मेढे, मुन्ना मेढे, सुपडु मेढे, अनिल मेढे , रोहित प्रकाश मेढे, रितेश मेढे,चंद्रमणी मेढे व सर्व फाईट क्लब आणि भिमपुत्र ग्रुपचे कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.