<
जळगाव -पुणे येथील गौर इव्हेन्ट अँड एन्टरटेन्मेन्टतर्फे भव्य खान्देशस्तरीय सौंदर्य स्पर्धेचे आयोजन १२ ते १६ नोव्हेंबर २०१९ रोजी खान्देश सेंट्रल मॉल येथे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेला मिसेस वर्ल्ड आदिती गोवित्रीकर आणि मॉडेल आणि माजी क्रिकेटर सलील अंकोला उपस्थित राहणार असून हि स्पर्धा महिला आणि तरुणींसाठी दोन गटात होणार असून ऑडिशनसाठी नावनोंदणी आवश्यक असल्याची माहिती संचालिका गौरी नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली . यावेळी संदीप पाटील, मनीष पत्रीकर , पंकज दारा , जयंत पाटील,यशोधर पेंडलया आदी उपस्थित होते .
सौंदर्य स्पर्धा १२ ते १६ नोव्हेंबर दरम्यान होणार असून जळगाव धुळे आणि नंदुरबार येथे स्पर्धेचे ऑडिशन होणार असल्याचे गौरी नाईक यांनी सांगितले. सौंदर्य स्पर्धांकडे स्त्रिया सहसा वळत नाही . त्यांना संधी उपलब्ध करून द्यावी यासाठी या सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १२ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत निवड झालेल्या सौंदर्यवतींसाठी विविध सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. ६० सौंदर्यवतींना स्पॉन्सरकडून मॉडेलिंगची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. आदिती गोवित्रीकर ,सलील अंकोला यांच्यासह ५ पाच तज्ज्ञ हे परिक्षिका म्हणून काम पाहणार आहे. त्यांच्याच हस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. १६ नोव्हेंबर रोजी ग्रँड फिनाले राहणार असल्याची माहिती गौरी नाईक यांनी यावेळी पत्रकारांना दिली .