<
प्रत्येक नागरिकांनी आपल्या मोबाईल मध्ये newsonair हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे
उस्मानाबादच्या आकाशवाणी केंद्रावरून रविवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी यांच्याकडून शपथ देण्यास सुरुवात होईल
उस्मानाबाद, दि.9:- उस्मानाबाद जिल्हा हा ग्रीन झोन मध्ये आहे संपूर्ण देशातून कोरोनाचे उच्चाटन होईपर्यंत आपला जिल्हा ग्रीन झोन मध्येच राहिला पाहिजे. यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे. तसेच यासाठी रविवार दिनांक 10 मे 2020 रोजी सकाळी 11 वाजता आपण भौतिक अंतर ( फिजिकल डिस्टन्ससिंग) ठेवून आपल्या घराच्या गॅलरीतून, घराच्या अंगणातून, शेतात व ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणाहून जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या समवेत शपथ घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेले आहे.
कोरोना चा प्रादुर्भाव थांबवायचा असेल तर समाजातील प्रत्येकाने मनापासून यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. जिल्हा ग्रीन झोन मध्येच राहण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून प्रशासनाला माहिती देऊन नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. रविवार दिनांक 10 मे 2020 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे या आकाशवाणीच्या उस्मानाबाद केंद्रावरून जिल्ह्यातील नागरिकांना शपथ देणार आहेत. तरी नागरिकांनी न्यूज ओन एअर( newsonair) हे एप्लीकेशन गुगल प्ले स्टोअरमधून आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.