वरणगाव,(प्रतिनिधी):-शहरातील हमीद सेठ कच्छी अडद धान्या व्यापारी यांचा अभियंता मुलगा सोहिल हमीद कच्ची यांनी कोरोना महासंकटात वरणगावकारणांसाठी एक सयानिटीझर व रेडिएशन स्वयचलीत इलेक्ट्रिक उपकरण स्वतः बनवले आहे त्या यंत्रात पाहिले मशीन खाली हात ठेवल्यावर सयानिटीझर आटोमॅटिक हातावर पडते परत 30 सेकंद हात चोळल्यावर एल ईडी लाईट च्या समोर धरल्यास रेडिएशन मुळे हातवरचे किटाणू मरण पावता असे महत्व पूर्ण उपकरण बनविले असून आपल्या नगरपरिषदेस सादर केले आहे त्यामुळे वरणगाव शहरात एक आदर्श उपकरण तयार केल्याने कोरोना संकटावर मात करता येऊ शकते हे उपकरण बनवण्यासाठी 2500 रुपये खर्च लागला आहे आज सोहिल हमिद कच्छी यांनी नगरपरिषद मध्ये येऊन नगराध्यक्ष सुनील काळे व मुख्यधिकारी शामकुमार गोसावी यांना सुपूर्द केले यावेळी अभियंता निशिकांत नागरे, गंभीर माळी, संजीव माळी, राजेंद्र गायकवाड , रवी धनगर, समाजसेवक इरफानभाई पिंजारी उपस्तिथ होते. यावेळी सोहिल कच्छी यांनी हे उपकरण बनवल्या मुळेनक्कीच इतर विद्यार्थ्यांना चालना मिळेल व संकटात गावाला बाहेर कसे काढता येईल त्यासाठी प्रयत्न करण्याचे आव्हान यावेळी सोहिल कच्छी यांनी केले.