<
जळगाव – (धर्मेश पालवे)-रिक्षा चालक व मालक हा आपला उदरनिर्वाह चालवण्या साठी तळमळ करत असतो. अनेक अडचणींना सामोरे जात,व्यवसाय मिळावा म्हणून प्रयत्न करत असतो.कुटूंबाचा भार, मुलांची शिक्षण, आरोग्य व इतर काही मूलभूत गरजा तटपुज्या कमाईवर भागवत असतो. मात्र असे असताना,शहरात काही विघ्नसंतोषी रिक्षा चालक अपहरण, दरोडा, खून, व इतर गुन्ह्यात सहभागी होत असतात,हे विघनसतोषी रिक्षा चालक नसतातच ते गुन्ह्यासाठी रिक्षाचा उपयोग घेत असतात,हे आजवर घडलेल्या अनुचित घटनावरून सिद्ध होते. आणि मात्र अश्या निदनिय घटना घडल्यास रिक्षा थांब्यावरील रिक्षा चालकास वेठीस धरले जाते, नाहक त्रास व पोलीस स्टेशन फेऱ्या घातल्या जातात. सढळ रिक्षा चालकावर पोलीस व आर टी ओ प्रशासन विभाग मार्फत कारवाई केली जाते. हे पाहता शहरातील वीर सावरकर रिक्षा युनियन चे जिल्हा अध्यक्ष मा दिलीप भाऊ सपकाळे यांनी शहरातील युनियनची बैठक घेतली, रिक्षा चालकांवर होत असलेल्या कारवाई बाबत उच्चार विनिमय घडवून आणला.
तसेच,रिक्षा चालकांवर कारवाई करण्याचा दृष्टीने पोलीस प्रशासन व आर टी ओ विभागातील अधिकारीना रिक्षा स्क्रॅब करणे थाबवावे अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी ,अश्या आशयाचे निवेदन ही मा दिलीप भाऊ सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित अधिकारीना देण्यात आले .त्याच बरोबर ,गुन्हेगारी प्रवृत्तीचा रिक्षा चालक आमच्या निदर्शनास आल्यास पहिले युनियन कारवाई करेल,नंतर पोलीस प्रशासन करेल ,व ताब्यात दिले जाईल.महिलांनी रिक्षात बसतांना चालकाच्या रिक्षाचा नंबर, सीट, रंग, व हावभाव लक्षात घेऊनच प्रवासात रिक्षा थांब्यावरून बसावे म्हणजे अश्या घटना घडणार नाहीत व स्वतःचे रक्षण करता येईल असा सूचना वजा संदेशही या बैठकीत दिला आहे.या बैठकीत, वीर सावरकर रिक्षा युनियन चे जिल्हा अध्यक्ष मा दिलीप भाऊ सपकाळे व सोबत सुभाष चौधरी, विलास ठाकूर, संभाजी पाटील, संजय कोळी, सुखदेव जाधव,रफिक बागवान,व रिक्षा चालक व मालक मोठ्या संख्येने उपस्तीत होते.