फैजपूर(किरण पाटील)- कोरोना व लॉकडाऊनच्या काळात महसूल व पोलीस प्रशासन बरोबर विद्युत मंडळ व युनियन बँकेचे महत्वाचे कार्य सुरू असून गेल्या पन्नास दिवसाच्या कार्यकाळात फैजपूर परिसरात कोरोना व लॉक डाऊनच्या कार्यकाळात यावल रावेर तालुक्यात एकही रुग्ण कोरोना ग्रस्त आढळून आलेला नसून खरी योगदान या परिसरात पोलीस व महसूल यांच्या पाठोपाठ विद्युत महामंडळ तसेच युनियन बँक कार्य सुद्धा महत्वाचे ठरत असल्याचे दिसत आहे.
गेल्या 50 दिवसाच्या कोरोना व लॉक डाऊनच्या परिस्थितीत परिसरात पोलीस व महसूल त्या पाठोपाठ युनियन बँक मध्ये शासनातर्फे अनेक योजना आल्या जन धन तसेच उज्वला असा खात्यांमध्ये शासनाकडून लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर याठिकाणी गर्दी वाढत असताना बँकेचे व्यवस्थापक जे एस टोकरे यांनी नियोजनबद्ध घरपोच सेवा दिली तसेच राज्य विद्युत मंडळ विनोद नरेंद्र सरोदे यांनी या काळात विद्युत पुरवठा सुरळीत ठेवत जातीने लक्ष देत असल्यामुळे नागरिकांमध्ये सुद्धा समाधान व्यक्त केला जात आहे.
तर अशा काळात गर्दी जमली असती आणि वेळोवेळी कर्मचाऱ्यांना ग्राहकांशी तोंड द्यावे लागते म्हणून विद्युत मंडळाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. सध्या विद्युत पुरवठा सुरळीत सुरू असून नागरिकांनी सुद्धा उन्हाळा सुरू असताना विजेची बचत करून काटकसरीने वापर करावा, असे आवाहन करीत आहे तसेच येथील एपीआय प्रकाश वानखडे यांनी या कार्यकाळात सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला आहे. तसेच फैजपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी अहोरात्र आपल्या कर्मचार्यांना सोबत घेऊन फैजपुरात सर्वत्र माक्स न लावणाऱ्या व लॉक डाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांना सुद्धा दंडात्मक कारवाई करीत आहे. मुख्याधिकारी यांच्यासोबत अविनाश चौधरी, टी एन चौधरी, रुबाब तडवी, वाणी साहेब, रमेश सराफ, नंदकिशोर कापडे, हमीद तडवी यांच्यासोबत कर्मचारी परिश्रम घेत असून यामुळे त्यांचे कार्य मोलाचे ठरत आहे.