भडगाव शहर अर्लट ७ दिवस स्वयंस्फुर्तीने बंद चा निर्णय
कोव्हिड-19चा पार्दुभाव दिवसेन दिवस वाढत आहे पाचोरा शहरात कोरोनाचा वाढता पार्दुभाव पहाता पाचोरा शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनत असुन त्यामुळे भडगाव शहराच्या वेशीवर आलेला कोरोनाला आळा घालण्यासाठी शहरवासीयांनी सर्वपक्षीय बैठक घेऊन स्वयंस्फुर्तीने शहरात ७ दिवस बंद जनता कर्फ्यू करण्याचा निर्णय घेतला. याबाबत तहसीलदार माधुरी आंधळे यांना निवेदन ही देण्यात आले. त्यामुळे स्वयंस्फुर्तीने शहरातील मेडीकल, दवाखाने व फक्त दुध विक्रीचे दुकान सोडुन सर्व दुकान पुर्णपणे बंद ठेवण्याचा निर्धार केला.
भडगाव तालुक्याला जवळ असलेल्या पाचोरा शहरात काल दिवसेन दिवस कोरोना पाॅझिटीव्ह रूग्ण आढल्याने भडगाव शहरशासीयांमधे धडकी भरली आहे. त्यामुळे दरवाज्यापर्यंत आलेल्या कोरोना ची साखळी खंडित करण्यासाठी शहरातील जागृत सर्वपक्षीय पदाधिकारी जागृत्त नागरिक, व्यापारी,पत्रकार बांधव यांनी शहरात स्वयंस्फुर्तीने सात दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत भडगांव तहसीलदार माधुरी आंधळे यांना सर्वपक्षीय पदाधिकाऱ्याच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी भडगांव पोलिस निरीक्षक धनंजय येरूळे, भडगांव न.पा.मुख्याधिकारी विकास नवाळे उपस्थित होते.
सात दिवस शहर पुर्णपणे बंद :-भडगाव शहर १० मे ते १७ मे पर्यंत पुर्णपणे बंद राहणार आहे. त्यात फक्त दवाखाने, ठराविक मेडीकल व दुध विक्रीचे दुकान सुरू राहणार आहेत..इतर सर्व दुकान ही पुर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय स्वयंस्फुर्तीने शहरवासीयांनी घेतला. नागरीकांनी वैद्यकीय कारणाशिवाय घराच्या बाहेर न पडण्याचा निर्धार केला आहे. पाचोरा शहार दिवसे दिवस कोरोना चे हॉटस्पॉट बनत आहे. त्यामुळे आपले शहर कोरोनामुक्त राहावे म्हणून सर्वपक्षीय बैठकित शहरवासीयांनी ७ दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी आदि विविध व्यापारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.त्यामुळे कोणीही घराबाहेर पडु नये घरातच रहा सुरक्षित रहा प्रशासनाला सहकार्य करा असे प्रशासनाच्या वतीने दै नजरकैद व सत्यमेंव जयते न्युज च्या माध्यमातुन जनतेला आवाहन करण्यात येत आहे.