फैजपूर(किरण पाटील) – करोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठबळ म्हणून फैजपूर येथील विरसावरकर व्यापारसंकुल मधील तेजल इंडेन गॅस एजन्सी चे मालक सौ.जयश्री प्रदीप पाटील, प्रदीप वसंतराव पाटील, व मुलगी तेजल पाटील, फैजपूर यांनी २१ हजार रुपयांची मदत म्हणून प्रांतप्रधान सहायता निधीस धनादेश प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांच्याकडे सुपूर्द केला आहे. या बाबत प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले सह व्यापारी वर्गातून पाटील परिवाराचे कौतुक होत आहे.