कळंब,प्रतिनिधी(हर्षवर्धन मडके)
जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी आज सकाळी 11 वाजता उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांना आपल्या जिल्ह्यात कोरोना विषाणूचा शिरकाव होऊ नये यासाठी शपथ दिली यामध्ये उस्मानाबाद जिल्हा ग्रीन झोन मध्ये आहे व त्याचा उस्मानाबाद जिल्हावासियांना सार्थ अभिमान होत आहे. अभिमान तसाच कायम ठेवण्यासाठी प्रत्येकाने घरीच बसून राहून प्रशासनाला सहकार्य करण्याची शपथ उस्मानाबादच्या आकाशवाणी केंद्रावरून दिली.
कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोहा येथे नागरिकांनी मनापासून यामध्ये सहभाग नोंदवला जिल्हा ग्रीन झोन मध्येच राहण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून प्रशासनाला माहिती देऊन नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.मोहा मध्ये नागरिकांनी भौतिक अंतर राखत शपथ घेतली यामध्ये घराबाहेर पडताना तोंडाला मास्क चा उपयोग करणे आणि इतरांना त्याचा उपयोग करण्यास सांगणे, भौतिक अंतर ( फिजिकल डिस्टन्ससिंग) राखणे, सैनिटायाझर चा उपयोग करणे , कामाशिवाय घराबाहेर पडू नये , हात- पाय वारंवार साबणाने स्वच्छ धुणे, व्यापार करताना कोरोना विषाणूच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करणे अशी शपथ घेतली यावेळी मोहा येथे शपथ घेताना मोहा चे सरपंच राजु झोरी, ग्रा वी अ लोकरे, केद्र प्रमुख जावळे सर, पोलिस पाटिल प्रकाश गोरे, ग्रा प कर्मचारी सुदर्शन मडके, दासा पायाल, बालू कोकाटे, अंगणवाडी कार्यकर्ती मदतनीस, आशा सेविका तसेच गावातील नागरिक सलीम मोमिन, मुजफर सय्यद तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.