जामनेर प्रतिनिधी–अभिमान झाल्टे
जामनेर शहर होमिओपॅथी असोसिएशन व पुष्पा मेडिकल एजन्सी संचालक निलेश शर्मा यांच्या संयुक्त विद्यमाने एक हजार नागरिकांना पुरेल असे होमिओपॅथी प्रतिबंधात्मक औषधी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांच्याकडे सोपविण्यात आले.
आयुष मंत्रालय भारत सरकार यांनी सदर औषधाची शिफारस केली असता ग्रामीण भागात परजिल्ह्यातुन व परराज्यातुन तसेच तालुक्यात मोढ्यां प्रमाणात नागरिक आले आहेत त्यातील काहींना होम कोरंटाईन तर काहींना मराठी शाळा,हॉस्टेल, मंगल कार्यालय, याठिकाणी इन्स्टिट्युशनल कोरंटाईन करण्यात आलेले आहे.
त्या सर्वांना या होमिओपॅथी औषधांचा सात दिवस डोस दिला जाणार आहे हा डोस घेणे ऐच्छिक राहणार आहे. त्यांचे नाव मोबाईल नंबर किती दिवस डोस घेतला याबाबत अंगणवाडी सेविका ,आशा स्वयंसेविका आरोग्य सेवक आरोग्य सेविका यांच्याकडे नोंद ठेवली ठेवण्यात आली असून जामनेर शहरातील बाहेरून आलेल्या नागरिकांना औषधी मिळण्यासाठी डॉ.विनय सोनवणे यांनी विशेष व्यवस्था केली आहे.
आयुष विभागाच्या डॉ.अपर्णा डांगरे यांच्याकडे सकाळी 9 ते12 पर्यंत आपले नाव व मोबाईल नंबर नोंदवून सदर औषध मिळणार आहे. या उपक्रमाची तहसीलदार साहेब अरुण शेवाळे यांनी सुद्धा सदर उपक्रमाची प्रशंसा केली आहे.
या कार्यंक्रमा प्रसंगी आरोग्य विभागाचे डॉ.मनोज तेली,डॉ.नामदेव पाटील, डॉ. राहुल वाणी,आशा कुयटे,बशीर पिंजारी, दिनेश बारी व होमिओपॅथी असोसिएशनचे डॉ. के. एम. जैन, डॉ.नरेंद्र कुलकर्णी, डॉ.मनोज विसपुते, डॉ.सागर पंडित, डॉ. अमोल पाटील,डॉ.योगेश इंगळे, डॉ.पवन पाटील उपस्तीत होते.व डॉ.सोनवणे यांनी सदर उपक्रमाबाबत होमिओपॅथी असोसिएशनचे आभार व्यक्त केले.