जळगांव(प्रतिनिधी)- स्वप्नसाकार फाऊंडेशनच्या अध्यक्षा भारती काळे यांना जनमत प्रतिष्ठान जळगांव यांचा तर्फे सामाजिक क्षेत्राचा राज्यस्तरीय अहिल्याबाई होळकर पुरस्कार-२०२० जाहीर करण्यात आला आहे. जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले यांच्या हस्ते निवडपत्र देवून जाहीर करण्यात आले.
भारती काळे यांनी स्वप्नसाकार फाऊंडेशनच्या माध्यमातून जळगांव शहरात व जिल्ह्यभरात विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत या मध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, अन्नदान, बेटी बचाव बेटी पढाव या अभियाना अंतर्गत समाजातील विधवा, घटस्फोटित, गरजू महिलांना हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून मेडिकल प्रशिक्षण मोफत देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व सक्षम बनविले त्याच बरोबर कोरोना या संकट काळात गरजूंना किचडी वाटप, मास्क वाटप, किराणा किट वाटप केले आहेत या कार्याबद्दल त्यांना राज्यस्तरीय अहिल्याबाई होळकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण लवकरच प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत होणार आहे. या निवडी बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.