<
औसा : सद्या जगभरामध्ये कोरोना विषाणुजन्य रोगाने थैयेमान घातला असून त्याचे पडसाद खेड्यापाड्यात पडल्याचे दिसून येत असून नागरिकांना कोरोना व्हायरस सारख्या आजारापासून सावधानता बाळगण्यासाठी चक्क औसा तालूक्यातील दावतपुर चे पोलीस पाटील हे गावातील चौकात जनता कर्फ्यू लागू झाल्या दिवसापासुन जनजागृती व केद्र शासनाच्या आदेशाचे पालन करा म्हणत चौकात खडा पहारा देत आहेत.
औसा तालुक्यातील दावतपुर हे तीन हजार लोकसंख्येचे गाव या गावचे पोलिसपाटील दतात्रय कुंभार यांनी जनता कर्फ्यू दिवसापासून गावभर एकटे फिरणे व नागरिकाने एकोप्याने थांबु नये या आजारापासून बचाव करण्यासाठी हाताची स्वच्छता राखावी शिंकताना तोंडाला रुमाल बांधावा. पुणे – मुंबईवरून आलेल्या १६० नागरिकांना भेटून शासकिय रुग्णालयात तपासुन घ्या व कुटुंबापासून वेगळे राहण्याचा सल्ला दिला सर्दी , खोकल्यासह तसे काही लक्षणे जाणवू लागले तर माझ्याशी,आरोग्य कर्मचाऱ्यांशी,अंगणवाडी,आशाकार्यकर्ती किवा सरपंचशी संपर्क साधण्याचे आव्हान पोलिस पाटील यांनी नागरिकांना केले आहे.
नागरिकांनी घाबरू नये…या आजारास गावातील नागरिकांनी घाबरण्याची अजिबात आवश्यकता नसून या कोरोना व्हायरस शी लढा देण्यासाठी आपण सर्वजण सहकार्य करावे. लाँक-डाऊनची काळ मर्यादा पुर्ण होई पर्यत नागरिकांनी घराबाहेर येऊ नये.देश हितास सहकार्य करावे असे पोलिस पाटील दतात्रय कुंभार यानी सत्यमेव जयते न्युज शी बोलताना म्हणाल