Saturday, November 28, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘कोविड १९ वॉर रुम’ च्या कामकाजाचे विभागीय आयुक्त यांनी केले कौतुक

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘कोविड १९ वॉर रुम’ च्या कामकाजाचे विभागीय आयुक्त यांनी केले कौतुक

पुणे दि. 13 : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या  ‘कोविड १९ वॉर रुम’ ला आज विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी केली. तसेच येथून होत असलेल्या कामाचे कौतुक केले. कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत डॉ. म्हैसेकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी चर्चा करुन त्यांना यावेळी सूचना केल्या. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार, संतोष पाटील, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय तसेच महापालिकेतील संबधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Maha Info Corona Website

महापालिकेच्या ‘कोविड १९ वॉर रुम’ मधून होणाऱ्या कामाचे कौतुक करुन महापालिकेच्या वतीने सुरु करण्यात आलेले कोविड केअर सेंटर (सीसीसी), डेलीकेटेड कोविड हेल्थ सेंटर (डीसीएचसी), डेलीकेटेड कोविड हॉस्पीटल (डीसीएच) मध्ये आजवर वैद्यकीय सुविधा घेतलेल्या नागरिकांची संख्यात्मक माहिती डॉ. म्हैसेकर यांनी घेतली.

गृह विलगीकरण व संस्थात्मक विलगीकरणाबाबत डॉ. म्हैसेकर यांनी माहिती घेऊन परदेशातून आलेल्या प्रवाशांचे संस्थात्मक विलगीकरण करताना विशेष दक्षता घ्यावी, असे सांगितले. गृह विलगीकरण केलेल्या नागरिकांच्या  जीपीएस ट्रॅकींगवर भर द्यावा, असे सांगून संस्थात्मक विलगीकरणाची क्षमता वाढविण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी फ्लू सेंटर मध्ये तपासणी केलेले रुग्ण, कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पीटल येथील खाटांची व्यवस्था, महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या स्वॅब तपासणीसाठी आतापर्यंत घेण्यात आलेले सॅम्पल, त्यातील पॉझिटीव्ह, निगेटीव्ह, प्रलंबित सॅम्पल ची संख्या, आतापर्यंतचे पॉझिटीव्ह, निगेटीव्ह व मृत रुग्ण, दैनंदिन वाढत जाणा-या केसेस, कोविड 19 बाबत जनजागृतीसाठी महापालिकेच्या वतीने करण्यात येणा-या उपाययोजना, स्थलांतरित मजुरांसाठी सुरू करण्यात आलेली निवारा केंद्रे, याबाबत श्री. हर्डीकर यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच कोरोना विषयक कामासाठी जवळपास दोन हजार स्वयंसेवकांची नोंदणी झाल्याचेही त्यांनी यावेळी  सांगितले. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोरोना व्हायरसच्या जनजागृतीसाठी दावतपुर पोलिसपाटलाचा खडा पहारा

Next Post

महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयाची विभागीय आयुक्त यांच्याकडून पाहणी

Next Post
महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयाची विभागीय आयुक्त यांच्याकडून पाहणी

महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयाची विभागीय आयुक्त यांच्याकडून पाहणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव येथे उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक कार्यालयीन इमारतीचे उद्घाटन; प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र सहसंचालक कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव– उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

जळगाव येथे उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक कार्यालयीन इमारतीचे उद्घाटन; प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र सहसंचालक कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव– उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

सुरेल स्वरांच्या बरसातीत रंगली रौप्यमहोत्सवी पाडवा पहाट

सुरेल स्वरांच्या बरसातीत रंगली रौप्यमहोत्सवी पाडवा पहाट

५४ व्या पाचोरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा शाळेचे घवघवीत यश

५४ व्या पाचोरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा शाळेचे घवघवीत यश

तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनाची देयके तातडीने सादर करा;सहसंचालक डॉ. पराग मसराम

तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनाची देयके तातडीने सादर करा;सहसंचालक डॉ. पराग मसराम

नेटबॉल स्पर्धेत बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या मुलींची बाजी; मुलांमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय विजयी

नेटबॉल स्पर्धेत बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या मुलींची बाजी; मुलांमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय विजयी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo