<
कळंब, तालुका प्रतिनिधी :- कोरोनाने जगात थैमान घातलेले असतानाच कळंब तालुक्यामध्ये तीन कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने कळंब तालुक्यात खळबळ उडाली आहे. उस्मानाबाद जिल्हा सामान्य रुग्णालय मार्फत लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत उस्मानाबाद जिल्ह्यातील 18 व्यक्तीच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली त्यापैकी 13 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून कळंब येथील 3 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून 2 व्यक्तीचे अहवाल (Inconclusive) आले असल्यामुळे त्याची उद्या पुनर्तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजाभाऊ गलांडे यांनी दिली.