<
फैजपूर(किरण पाटील)- आजवर कोरोनाचा एकही रूग्ण नसल्याने निर्धास्त असलेल्या फैजपुरकरांना आज एक बाधीत रूग्ण आढळून आल्याने धक्का बसला आहे. दरम्यान, रूग्णाचा रहिवास असणार्या भागात प्रशासनाने सील करण्यास प्रारंभ केला असून जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. याबाबत माहिती अशी की, आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये फैजपूर येथील एक रूग्ण बाधीत असल्याचे वृत्त शहरात पसरताच भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधीत रूग्ण ही दक्षिण बाहेरपेठ भागातील सिंधी कॉलनी मधील महिला रहिवासी असून ती महिला काही दिवसांपूर्वी अहमदाबाद येथून आल्याचे कळते. दरम्यान, ही महिला कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे कळताच प्रशासनाने सिंधी कॉलनी परिसर सील करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. फैजपूर येथील प्रशासनाने आजवर शहरात एकही कोरोना बाधीत होऊ नये यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे. प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले व फैजपूर नगरपरिषद येथील मुख्याधिकारी किशोर चव्हाण, ए.पी.आय.प्रकाश वानखडे व त्यांचे सहकारी कर्मचाऱ्यांनी लॉकडाऊनचे पालन करण्यासाठी प्रयत्नशील होते. दि१४ मे रोजी एक बाधीत रूग्ण आढळून आल्याने शहरवासियांनी सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचे अधोरेखीत झाले आहे. तसेच प्रशासनाने लोकांना घाबरून न जाता लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्याची आवश्यकता आहे असे आवाहन केले आहे.