<
कळंब, प्रतिनिधी (हर्षवर्धन मडके)
कळंब तालुक्यातील मोहा येथे ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांना २००० सँनिटायझर वाटप करण्यासाठी आशा कार्यकर्तीकडे सुपूर्द करण्यात आले. कळंब तालुक्यात कोरोणाचे तीन रुग्ण आढळून आल्यामुळे कळंब तालुक्यात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर मोहा ग्राम पंचायत कडून २००० सँनिटायझर वाटप करण्यात येणार आहे तसेच आशा कार्यकर्ती घरोघरी जाऊन हे सँनिटायझर वाटप करणार आहेत तसेच प्रशासनाला सहकार्य,लॉकडाऊनचे काटेकोर पालन तसेच मास्क,सँनिटायझर यांचा नियमित वापर केला पाहिजे असेही निर्देश देत आहेत. आशा कार्यकर्ती कडे सँनिटायझर सुपूर्द करताना मोहाचे सरपंच राजू झोरी,ग्रा.वी.अ लोकरे, माजी सरपंच बाबा मडके,सहशिक्षक संजय मडके,संताजी वीर,पोलिस पाटील प्रकाश गोरे,तंटामुक्ती अध्यक्ष निरंजन दत्त पाटील, तंटामुक्ती उपाध्यक्ष अंकुश मडके,सलीम मोमीन,ग्राम पंचायत कर्मचारी सुदर्शन मडके , जमीर शेख,रणजित मडके,मयुर मडके,प्रदीप मडके, अजिंक्य मडके,महेंद्र मडके आणि ग्रामस्थ उपस्थित होते.