<
परवाच एका मिडीयाला बोलताना चंद्रकांत दादा म्हणाले की. शरद पवारांशी टक्कर घेतल्याने रणजितसिंह यांना उमेदवारी. भारतीय जनता पार्टी चा सुसंस्कृत पक्षाचा प्रदेशाध्यक्ष विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून पवार साहेबांना टक्कर देण्याची भाषा करत असेल तर. चंद्रकांतदादा पवार साहेब तर लांबच राहू द्या. त्या आधी एकदा भारत नानांचा नाद करून तर बघा. म्हणजे तुम्हाला समजेल की. या कार्यकर्त्यावरून हिमालयाची उंची असलेल्या नेत्याची ताकद आणि आवाका तुम्हाला समजेल.अश्या शब्दात भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा समाचार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी घेतला आहे.
विधानसभेच्या निवडणुकीआधी आपलेच मुख्यमंत्र्यां देवेंद्र फडणवीस यांनी ही पवार साहेबांना अशीच भाषा केली होती. मला विरोधक दिसतच नाही, पवार साहेबांचे राजकारण आता 2019 नंतर संपलेले दिसेल. अशा अनेक फुशारक्या मारल्या पण झालं काय ? 105 आमदार निवडून येऊन क्रमांक 1 चा असणारा पक्ष विरोधी बाकावर बसू शकतात यालाच पवारनीती म्हणतात हे ही लक्षात असू द्या.
चंद्रकांत दादा पवार साहेबांचं नाव घेण्यापर्यंत जाऊच नका.एकट्या आमदार भारत भालके यांनी 2009 ला पासंगाला सुद्धा येऊ दिलं नव्हतं. आख्खा माळशिरस तालुका पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात तळ ठोकून होता. तरीसुद्धा आमदार भारत नाना भालके 30 ते 35 हजार मताधिक्याने निवडून आले होते.
2014 आणि 2019 च्या विधानसभेची निवडणुकीच्यावेळी विद्यमान विधान परिषद आमदार प्रशांतराव परिचारक, श्रीमंत सुधाकरपंत परिचारक यांचाही या पवार साहेबांच्या चेल्याने पराभव केला होता. हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले आहे. चंद्रकांत दादा साहेबांच्या आवाक्याच माप घेण्याआधी पवार साहेबांचा चेला आमदार भारत नाना ला टक्कर द्या मग बघू घोडामैदान कोण काबीज करते.
लोकसभेचे कौतूक करत असताना खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांना दिलेले एक लाखाचं लीड विधानसभेला कुठे गायब झालं !!! लोकसभेला एक लाखाचे लीड आणि विधानसभेला 2300 मताने आमदार सातपुते निवडून येतात याचा तरी अभ्यास नीट केलाय का ? आणि चंद्रकांत दादा तुमच्या तेवढीच खुमखुमी असेल तर आज तुम्हाला आव्हान करतो की 2024 ची विधानसभा तुम्ही पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून लढवा जर तुम्हाला आमदार भारत नाना भालके आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिवसा चांदणं नाही दाखवले तर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून नाव लावणार नाही असे ही श्रीकांत शिंदे म्हणाले.