<
एरंडोल(प्रतिनिधी)- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन आणि सोशल डीस्टन्स राखून मराठा पाटील समाजात मोजक्या वऱ्हाडीत आदर्श विवाह खडके बु. ता एरंडोल येथे आज रोजी संपन्न झाला.
खडके बु. येथील रहिवासी सुभाष आत्माराम पाटील यांचे चिरंजीव (अजय) व खडक देवळा ता. पाचोरा येथिल रहिवासी सुभाष बाबुराव पाटील यांची कन्या (सरिता)यांचा शुभमंगल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिंताजनक स्थितीत अतिशय साध्या पध्दतीने पार पडला. सध्याच्या परिस्थितीचे भान राखून मराठा समाजात आदर्श पायंडा निर्माण केल्याबद्दल या वधुवराच्या पालकांच्या निर्णयाचे समाजात कौतुक केले जात आहे, इतरांनी देखील असा आदर्श घेऊन आटोपशीर पद्धतीने विवाह केले तर वधु वर कडील मंडळी, पाहुणे, आदींची धावपळ कमी होईल वेळ, पैशाची बचत होते, या आदर्श विवाहप्रसंगी उपस्थित खडके बु. उपसरपंच सुनिल पाटील, माजी सरपंच विजय पाटील, पंत प्रकाश पाठक, दक्षता समितीचे सदस्य भरत पाटील, पत्रकार अतुल पाटील, देशदूत प्रतिनिधी वाल्मीक पाटील आदी उपस्थित होते.