<
जळगाव- इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव तर्फे मा. अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील दिव्यांग व गरजू कुटुंबियांना जीवनावश्यक किराणा किटचे वाटप जागतिक रेडक्रॉस दिनी करण्यात आले. सध्याच्या lockdown परीस्थितीमुळे समाजातील सर्वच घटकांना दैनदिन जीवन जगण्यासाठी सामना करावा लागत आहे. अशातच समाजातील दिव्यांग घटकाला तर सर्व सामन्यापेक्षा अधिक खडतर जीवन जगावे लागत आहे.
सर्व सामान्याप्रमाणेच दिव्यांग व्यक्तींना देखील सद्य परिस्थितीत उदरनिर्वाह करणे अधिक कठीण झाले आहे. हे लक्ष्यात घेऊन मा. अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील १५० दिव्यांग बांधवाना व गरजू कुटुंबांना किराणा मालाच्या किटचे वाटप मा. अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते जागतिक रेडक्रॉस दिनाच्या दिवशी वाटप करण्यात आले.
सध्याच्या जागतिक आपत्तीमुळे सर्व सामान्य जनतेची जगण्यासाठीची होरपळ लक्ष्यात घेता, त्यांच्या आयुष्यात मदतरुपी फुंकर घालण्याचे विविधरुपी सेवाकार्य इंडिअन रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातून केले जात आहे. त्यात कम्युनिटी किचन अंतर्गत दररोज सकाळ संध्याकाळ 3500 जेवणाचे पाकीट जळगाव शहरातील विविध गरीब वस्तीतील दिव्यांग बांधव, गोर गरीब, अस्थायी कामगारांचे कुटुंब यांना वाटप करीत असून आज पर्यंत १००००० च्या वर फूड पाकीटचे वाटप करण्यात आले. तसेच फिरता दवाखाना माध्यमातून रुग्णांची मोफत तपासणी व औषधोपचार, ईम्युनीटी वाढवण्यासाठी आरसेनिक अल्बम ३० चे होमिओपथिक औषधी, मास्क, sanitizer, डेटाॅल साबण यांचे वाटप, महानगर पालिकेच्या स्वच्छता विभागाचे कर्मचारी, झोपडपट्टीतील रहिवाशी, भाजीपाला व फळ विक्रेते, काम्युनिटी किचनमध्ये कार्यरत व इंडिअन रेडक्रॉस सोसायटीचे स्वयंसेवक यांना वाटप करण्यात आले.
सदर सेवाकामी संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी मा. डॉ. अविनाश ढाकणे यांचे मार्गदर्शनानुसार उपाध्यक्ष – श्री. गनी मेमन, मानद सचिव – श्री. विनोद बियाणी, डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी – चेअरमन (रक्तपेढी), सह कोषाध्यक्ष श्री अनिल कांकरिया, सह सचिव – श्री. राजेश यावलकर, आपत्ती व्यवस्थापनाचे चेअरमन – श्री. सुभाष सांखला, नोडल ऑफिसर श्री. जी. टी महाजन, कार्यकारिणी सदस्य – श्री. अनिल शिरसाळे व रेडक्रॉस कार्यकारणी यांच्या अधिपत्याखाली रेडक्रॉसचे स्वयंसेवक, वैद्यकीय पथक, प्रशासकीय कर्मचारी यांच्या उस्फुर्त सेवा कार्यामुळे फार मोठा दिलासा समाजातील गरजू, दिव्यांग, गोरगरीब व कामगार वर्गाला प्राप्त होत आहे.