<
मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले
मुलुंड पश्चिम येथील साल्पादेवी पाडा साईकृपा सोसायटी आणि एमसीएचआय-बीजेएस यांच्या संयुक्त विद्यमाने साल्पादेवी पाडा येथे सामाजिक कार्यकर्ते जगदीश शेट्टी यांच्या सौजन्याने मोफत वैद्यकीय शिबिर आज सकाळी १० ते ३ वाजेपर्यंत आयोजिण्यात आले होते.
या वैद्यकीय शिबिरात सर्दी, ताप, खोकला, त्वचेचे आजार, अंगदुखी, इत्यादी आजारांसंबंधित तपासणी करण्यात आली व औषधे देण्यात आली. लहान मुलांचे साथीचे आजार यावर तज्ञ डॉक्टरांचा मोफत सल्ला व औषध देखील देण्यात आले. थर्मल टेंपरेचर मशीन द्वारे नागरिकांची मोफत चाचणी सुद्धा करण्यात आली. एकूण ५६७ नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.
सोसायटीचे अध्यक्ष बाबा पवार, सचिव रामचंद्र सकपाळ, खजिनदार एम.आर. राठोड, सभासद संदीप शिंदे, महेश धुरी, अविनाश दसबुड, स्नेहा कोयरी, अनंत गुरव, तुकाराम येडगे, विजय शेट्टी, मनोज जाधव, प्रवीण प्रसन्न, इत्यादींनी या आरोग्य शिबिराच्या आयोजनात विशेष मेहनत घेतली.