कळंब, प्रतिनिधी(हर्षवर्धन मडके)
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणा युद्धपातळीवर कष्ट घेत आहेत. कळंब तालुक्यातील मोहा मध्ये अंगणवाडी सेविका, तसेच डिजिटल सखी अंतर्गत महिला ग्राम पंचायत ने दिलेल्या २००० मोफत सँनिटायझरचे घरोघरी जाऊन वाटप करीत आहेत तसेच आदिवासी लोकांना ५०० मास्क चे वाटप करणार आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना धैर्य मिळत असल्याचे चित्र आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊन लागू करण्यापूर्वी शेकडो नागरिक विविध शहरांतून गावांकडे परतले आहेत.कोरोना व्हायरसपासून संरक्षणासाठी प्रत्यक्ष घरोघरी जाऊन जनजागृती करून ग्रामस्थांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे तसेच स्वच्छतेचे प्रात्यक्षिक करून दाखवत आहेत. पंचायत प्रमाणेच आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी या कामात मदत करीत आहेत. तसेच टीम मध्ये डिजिटल सखी प्रकल्प अंतर्गत श्रद्धा जोशी, अलका मडके, आशा कसबे, रेशमा सुडके, पार्वती मडके, विमल कसबे कार्यरत आहेत तसेच अंगणवाडी कार्यकर्ती आणि मदतनीस म्हणून विजया देशमुख, सत्यशिला कवडे, छाया दुर्गकर, शालन सूडके, अर्चना बनसोडे, सुवर्णा झोरी, भोंडवे हिराबाई, सोजर विधाते, अनिता मते, नागरबाई आडसुळ या कार्यकर्ती कार्यरत आहेत.
मोहाचे सरपंच राजू झोरी यांनी अंगणवाडी कार्यकर्ती आणि CRP यांना प्रोत्साहन केले. यावेळी ग्राविअ सी एन लोकरे, माजी सरपंच बाबा मडके, ग्राम पंचायत कर्मचारी सुदर्शन मडके, जमीर शेख, सलीम मोमीन इत्यादी नागरिक उपस्थित होते.