फैजपूर(किरण पाटील)- फैजपूर शहरात एका ५६ वर्षीय महिलेचा कोरोना विषाणू चा अहवाल पॉझिटिव्ह आलेला होता. त्या महिलेच्या संपर्कात आलेल्या ६ जणांचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. मागील काही दिवसात शहरात एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने फैजपूर वासीयांची चिंता वाढलेली होती. महिलेच्या संपर्कातील त्या ६ जणांची चाचणी अहवाल दि.१७ रोजी निगेटिव्ह आलेला आहे.
पॉझिटिव्ह आलेल्या महिलेला उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा सुध्दा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. निगेटिव्ह अहवाल आल्यामुळे नगरपालिका, पोलीस प्रशासनासह आरोग्य यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे व शहारवासीयांना दिलासा मिळाला आहे.