जळगाव(प्रतिनिधी)- संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात कोरोणा या रोगाने थैमान घातले असून या रोगाच्या पृष्ठभूमीवर केंद्र व राज्य सरकारने संपूर्ण देशातसह राज्यात लॉकडाऊन लागू केला व तसेच यासाठी कडक कारवाईची अंमलबजावणी देखील केली आहे. याचा परिणाम जळगाव जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात पूर्वापार पासून पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या कुंभार समाजावर झाला आहे. कुंभार समाजावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली असून शासनाने जिल्ह्यातील प्रामाणिक आणि कष्ट करणाऱ्या कुंभार समाजासाठी आर्थिक मदत द्यावी किंवा बँक कर्ज रुपाने तरी त्यांची मदत करावी,अशी मागणी कुंभार समाजाचे जळगाव जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर कापडे यांनी केली आहे.विशेषता ग्रामीण भागांमधील कुंभार समाज हा गरीब व भूमिहीन असून अपुरे शिक्षण पुरेसे भांडवल नसल्याने व कोणत्याही प्रकारचे आधुनिक कौशल्य इत्यादींचा अभाव असल्याने सततचे आर्थिक टंचाई व आपल्या कुटुंबाची जगण्याची धडपड करीत असतो. आणि अशा परिस्थितीमध्ये साधारणता प्रत्येक वर्षांमध्ये डिसेम्बर ते मे या कालावधीमध्ये वर्षभराचा उदरनिर्वाह करण्यासाठी लहान-मोठे माठ सणासुदीला पणत्या बुगडी, बोयकी व मूर्ती बनवणे गणेशोत्सवासाठी मूर्ती बनविणे तसेच वीट व्यवसाय इत्यादींच्या माध्यमातून कष्ट करून आपल्या पोटाची खडगी भरत असतो परंतु कोरोणा रोगाच्या पार्श्वभूमीवर सरकारने राज्यात लॉकडावून जाहीर केला असल्याने उत्पादन आणि खरेदी-विक्री पूर्णता बंद आहे. त्यामुळे सद्यस्थितीत आमच्या कुंभार समाजावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली असून शासनाने जिल्ह्यातील प्रामाणिक आणि कष्ट करणाऱ्या कुंभार समाजासाठी आर्थिक मदत द्यावी किंवा बँक कर्ज रुपाने तरी त्यांची मदत करावी,अशी मागणी .कुंभार समाजाचे जळगाव जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर कापडे यांनी केली आहे.