उस्मानाबाद,दि.18(जिमाका):-महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत जेष्ठ नागरिकांना स्मार्टकार्ड देण्यात येत आहे.ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्टकार्ड प्राप्त करुन घेण्यासाठी मुदत दि.30 एप्रिल 2020 पर्यंत देण्यात आली होती.परंतु सध्या कोरोना विषाणू कोविड-19 संसर्गाचा धोका झाला असल्यामुळे शासनाकडून गर्दी कमी करण्याबाबत विविध उपायोजना अंमलात येत आहे. कोरोना विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक प्रवाशांना आगारात येऊन स्मार्टकार्ड घेणे शक्य नसल्याने तसेच त्या संबंधीची माहिती आगारात येऊन प्रत्यक्ष देता येत नसल्यामुळे सदर योजनेला दि.14 ऑगस्ट 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. दि. 15 ऑगस्ट 2020 पासून राज्य परिवहन महामंडळाच्या बसद्वारे प्रवासासाठी स्मार्टकार्ड बंधनकारक करण्यात येत आहे. दि.14 ऑगस्ट 2020 पर्यंत ज्येष्ठ नागरिकांनाप्रवासाकरिता सध्याची प्रचलीत असलेली ओळखपत्र ग्राहय धरण्यात येऊन प्रवास करण्यास मुभा देण्यात येत आहे.असे विभाग नियंत्रक,रा.प.उस्मानाबाद यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.