उस्मानाबाद(जिमाका):- महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचा कालावधी दिनांक 31 मे 2020 पर्यंत वाढविला आहे व लॉकडाऊनच्या कालावधीत करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांनीं करोना विषाणू (COVID-19) चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यात लॉकडाऊनचा कालावधी दिनांक 31 मे 2020 पर्यंत वाढवण्यात येत असल्याचे आदेशित केले आहे. तसेच खालील सर्व बाबी दिनांक 31 मे 2020 पर्यंत लॉकडाउनचे कालावधीत पूर्वीप्रमाणेच लागू राहतील असे आदेशित केले आहे.1. राज्यांतर्गत व आंतरराज्य विमान प्रवासी वाहतूक (वैद्यकीय सेवा व संरक्षण सेवा आणि भारत सरकारचे गृहमंत्रालयाने परवानगी दिलेल्या बाबी वगळता) 2. रेल्वेची सर्व प्रकारचे प्रवासी वाहतूक (संरक्षण सेवा आणि भारत सरकारचे गृहमंत्रालयाने परवानगी दिलेल्या बाबी वगळता)3. सार्वजनिक वाहतूककरिता आंतरराज्य बस सेवा (भारत सरकारचे गृहमंत्रालयाने परवानगी दिलेल्या बाबी वगळता)4. मेट्रो रेल्वे सेवा.5. आंतरराज्य व वैयक्तिक प्रवासी वाहतूक (वैद्यकीय कारणास्तव व भारत सरकारचे गृहमंत्रालयाने परवानगी दिलेल्या बाबी वगळता)6. सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक/प्रशिक्षण/कोचिंग क्लासेस इ.संस्था बंद राहतील तथापि ऑनलाईन/दूरस्थ शिक्षण प्रणालीत परवानगी राहील.7. आतिथ्य सेवा (आरोग्य, पोलीस, शासकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, प्रवासी व्यक्तींसह अडकलेल्या व्यक्ती यांचे निवासाकरिता व विलगीकरण सुविधाकरीता घेतलेल्या सेवा वगळून)8. सर्व सिनेमागृ,ह शॉपिंग मॉल्स, व्यायामशाळा, क्रीडा संकुल, जलतरण तलाव, मनोरंजन केंद्रे, चित्रपटगृहे,कलाकेंद्रे, बार व सभागृहे आणि तत्सम ठिकाणे.
9. सर्व सामाजिक/राजकीय/ क्रीडा/मनोरंजन/शैक्षणिक/सांस्कृतिक/धार्मिक कार्यक्रम व इतर सभा संमेलने.10. सर्व धार्मिक ठिकाणे व प्रार्थनास्थळे जनतेसाठी बंद राहातील. धार्मिक मेळावे, सभा संमेलने घेण्यास सक्त मनाई असेल.11. पान,तंबाखू इ. पदार्थांची दुकाने बंद राहतील.12.सर्व अत्यावश्यक बाबी वगळून सायंकाळी 7 ते सकाळी 7 या कालावधीत व्यक्तींच्या हालचालीला कडक प्रतिबंध राहील. 13.65 वर्षांवरील व्यक्ती, दुर्धर आजारग्रस्त व्यक्ती, गरोदर महिला, 10 वर्षाखालील मुले यांनी घरीच राहणे आवश्यक आहे. (राष्ट्रीय निर्देशांनुसार अत्यावश्यक गरजा व आरोग्यविषयक बाबींच्या पूर्ततेकरिता होणारी हालचाल वगळून) 14. तसेच महाराष्ट्र शासनाने संदर्भ क्रमांक 5 अन्वये दिलेल्या आदेशासोबतचे जोडपत्र 1 मधील कोविड-19 चे व्यवस्थापनासंदर्भात सूचनांची अंमलबजावणी करणे बंधनकारक राहील. आस्थापना सुरु करणेबाबत चे मूळ आदेशान्वये जारी केलेली नियमावली संदर्भ क्रमांक 9 चे आदेशान्वये या नियमावलीतील मुद्दा क्रमांक 1 मध्ये करण्यात आलेल्या सुधारणेसह उस्मानाबाद जिल्ह्यात कळंब नगर पालिका क्षेत्र वगळता दिनांक 31 मे 2020 पर्यंत पूर्वीप्रमाणेच अंमलात राहील. जिल्हाधीकारी यांच्य आदेशांमध्ये नमूद केलेल्या गैरकृत्यांबाबत दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिनांक 31 मे 2020 पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात लागू राहतील. कृषी उत्पन्न बाजार समिती बाबतचे आदेश उस्मानाबाद जिल्ह्यात कळंब नगर पालिका क्षेत्र वगळता दिनांक 31 मे 2020 पर्यंत पूर्वीप्रमाणेच लागू राहतील. महामार्गावरील ढाबा चालू ठेवणेबाबतचे आदेश उस्मानाबाद जिल्ह्यात कळंब नगर पालिका क्षेत्र वगळता दि.31 मे 2020 पर्यंत पूर्वीप्रमाणेच लागू राहतील. बेकरी व स्वीट मार्ट बाबतचे आदेश उस्मानाबाद जिल्ह्यात कळंब नगर पालिका क्षेत्र वगळता दिनांक 31 मे 20 20 पर्यंत पूर्वीप्रमाणेच लागू राहतील. गृह विलगीकरण (Home Quarantine) च्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरोधात दंडात्मक कारवाई करणे बाबतचे आदेश संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात दिनांक 31 मे 2020 पर्यंत पूर्वीप्रमाणेच लागू राहतील. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची उस्मानाबाद जिल्हांतर्गत बस वाहतूक सेवा बंद ठेवणेबाबतचे आदेश संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात दिनांक 31 मे 2020 पर्यंत पूर्वीप्रमाणेच लागू राहतील. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, उस्मानाबाद पोलीस अधीक्षक, उस्मानाबाद अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क,
उस्मानाबाद, विभाग नियंत्रण रा.प.उस्मानाबाद सर्व INCIDENT COMMANDER तथा उपविभागीय दंडाधिकारी] सर्व INCIDENT COMMANDER तथा तालुका दंडाधिकारी जिल्हा उस्मानाबाद, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, उस्मानाबाद, जिल्हा प्रशासन अधिकारी,न.पा.प्र.जि.का. उस्मानाबाद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी,(ग्रा.प.) जि.प.उस्मानाबाद, सर्व गटविकास अधिकारी, पंचायत समिती, सर्व मुख्याधिकारी नगर/ परिषद/नगर पंचायत, ग्रामसेवक, तलाठी जिल्हा उस्मानाबाद इत्यादींची असेल. सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच उपरोक्त वाचा क्रमांक 2 मधील महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 चे नियम 11 नुसार, भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)कलम 188 मधील तरतुदींनुसार दंडनीय/कायदेशीर कारवाईस पात्र राहील. सदर आदेशाची अंमलबजावणी दिनांक 17 मे 2020 पासून तात्काळ लागू करण्यात येत आहे.