<
जळगांव(धर्मेश पालवे) – जिल्ह्यातील राजकीय, आर्थिक,सामाजिक आणि अद्योगिक विकास पाहता गेल्या पाच वर्ष्याचं चित्र हे विविध पैलूंचा विचार करण्यास बुद्धिजीवी व दूरगामी विचारवंतास भाग पडते की, महानगरपालिका, जिल्हा परिषद,ग्रामीण व्यवस्था, शेतकरी प्रश्न,बेरोजगारी व विविध शासकीय योजनांची अमलबजावनी ही प्रामाणिक आणि सर्वतोपरी उपयोगी अशी कधीही झाली नाही,हे आज तागायत झालेली भाजप सरकार विरोधी निदर्शने,उपोषणे, आंदोलने आणि विरोधात्मक उठाव पाहून सांगता येईल.
एवढंच नव्हे तर,भाजप सरकारने उत्तर महाराष्ट्रात तथा स्थानिक राज्यकर्त्यानी मा एकनाथ खडसे यांची राजकीय वर्तुळात केलेली कोंडी,धुळ्याचे आमदार यांची राजकारणातून केलेली पिळवणूक,आणि जळगावातील लहान मोठया नेत्यांच्या हस्तकाना डावलण्याच काम केलं आहे,हे सर्वश्रुत आहे.
मा.आ.शिरीष चौधरी यांनी आज केलेल्या रावेर येथील जाहीर सभेत भाजप सरकारवर टीकास्त्र सोडत केलेला बहुजन समाजातील नेत्याचा फक्त राजकारणात वापर केला जात आहे असा आरोप खरा असल्याचे वरील उदाहरणावरून सिद्ध हिते,म्हणून राष्ट्रवादी, काँग्रेस व मित्र पक्षांच्या एकत्रित लढ्याचीही दुसरी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली मात्र, त्यातही काहीसा राम शिलकी नाही.परंतु, त्यांनी केलेले विधान हे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळ लक्षात घेवोत हे अपेक्षित आहे.
जळगावातील मतदार कसा आहे व इथला आमदार कसा आहे, कसा असावा याबाबत जेष्ठ समाजसेवक मा शिवराम पाटील यांच्या गाजलेल्या मागील महिन्यातील प्रसारित प्रचलित व्हिडीओ तुन लक्षात घेण्या सारख आहे.
आज तरुण वर्ग गाफील,आणि कार्यकर्ते ही गाफील आहेत.याच शहरात वर्चस्व वादा साठीआरोप होणं, हल्ला होणं हे ही गंभीरच आहे. तरी, तूर्तास राजकारण्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे,अन्यथा सुगीचे दिवस बदलन्यास काळ तो किती लागणार.जनमानसात असलेली ओळख टिकवून ठेवायची व बद्दलवायची असल्यास राज्यकर्त्यांनी धोरण बदलेले पाहिजे.अन्यथा बहुजन समाजाच्या नेत्यांवर भाजप सरकार अन्याय करत आहे असा संदेश वजा विचार जनमानसात रुजला जाईल हे निश्चित.