कळंब प्रतिनिधी | हर्षवर्धन मडके
कळंब तालुक्यातील मोहा गावामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कडेकोट उपाय योजना राबवल्या जात आहेत. डॉक्टर राहुल नागरगोजे, आरोग्य कर्मचारी, सरपंच राजू झोरी , पोलिस पाटील प्रकाश गोरे, तंटामुक्ती उपाध्यक्ष अंकुश मडके, ज्ञान प्रसार विद्यालयाचे मुख्याध्यापक टी.जे चौधरी ग्राम पंचायत कर्मचारी सुदर्शन मडके, तसेच कोरोना वॉरियर्सची टीम यांच्याकडून बाहेर गावाहून आलेल्या व्यक्तीची चौकशी करून मोहा मधील ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात Quarantine केलेल्या व्यक्तींवर चोख नजर ठेवली जात आहे. तसेच Quarantine व्यक्तींचा संपर्क येऊ नये म्हणून योग्य त्या उपाय योजना केल्या जात आहेत. आरोग्य अधिकारी वेळोवेळी Quarantine केलेल्या व्यक्तीच्या आरोग्याची तपासणी करत आहेत आणि बाहेरून आलेल्या व्यक्तीची तपासणी करून हातावर Quarantine चा शिक्का मारत आहेत. या कर्मचाऱ्यांची तत्परता पाहता सगळीकडे कौतुक होत आहे.