Monday, August 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उस्मानाबाद व तुळजापूर नगरपालिका क्षेत्रातील सर्व खाजगी आस्थापना व दुकाने 31 मे पर्यंत बंद करण्याचे आदेश- जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
उस्मानाबाद व तुळजापूर नगरपालिका क्षेत्रातील सर्व खाजगी आस्थापना व दुकाने 31 मे  पर्यंत बंद करण्याचे आदेश- जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे

उस्मानाबाद, दि.20(जिमाका) :- महाराष्ट्र शासनाने कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचा कालावधी दिनांक 31 मे 2020 पर्यंत वाढविला आहे.उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद व तुळजापूर नगर पालिका क्षेत्रामध्ये कोरोना विषाणू   (COVID-19) चा रुग्ण आढळून आलेला असल्यामुळे आणि कोरोना विषाणू (COVID-19)  चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  उस्मानाबाद व तुळजापूर नगर पालिका क्षेत्रात नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. 

जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी (COVID-19)  होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरिकांची एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद व तुळजापूर    नगर पालिका क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय कार्यालये, पिण्याचे पाणी पुरवठा व सांडपाणी निचरा व्यवस्थापन करणाऱ्या आस्थापना, सर्व बँका, दूरध्वनी व इंटरनेट सेवा पुरवठा करणाऱ्या आस्थापना, अन्न, भाजीपाला, दूध आणि किराणा पुरविणाऱ्या आस्थापना (सकाळी 8 ते दुपारी 2 या कालावधीतच सुरु राहतील). उस्मानाबाद व तुळजापूर नगर पालिका क्षेत्रातील पेट्रोल व डिझेल पंप सकाळी 8 ते सायंकाळी 6 या वेळेत चालू राहतील. तथापि उस्मानाबाद शहरातील पोलीस वेलफेअर पेट्रोल पंप दररोज 24 तास (24×7) चालू राहील.

 बी-बियाणे व खते या कृषी निविष्ठांची विक्री करणारी दुकाने, आस्थापना, कृषी यंत्रसामग्री, त्यांचे सुटे भाग (त्याच्या पुरवठा साखळीसह) व त्यांच्या दुरुस्तीची दुकाने सकाळी 8 ते सायंकाळी 6 या वेळेत चालू राहतील.दवाखाने, वैद्यकीय केंद्र व औषधी दुकाने, विद्युत पुरवठा, ऑईल व पेट्रोलियम व ऊर्जा संसाधने, प्रसार माध्यमे, मीडिया, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आय.टी. आस्थापना व दुकाने वगळून उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद व तुळजापूर नगर पालिका क्षेत्रातील सर्व आस्थापना व दुकाने दिनांक 31 मे 2020 पर्यंत बंद करण्याचे आदेश दिले आहेत.         

या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही पोलीस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, उस्मानाबाद  व तहसीलदार उस्मानाबाद व तुळजापूर, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर पालिका प्रशासनाचे जिल्हा प्रशासन अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, उस्मानाबाद व तुळजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी, उस्मानाबाद व तुळजापूर  शहरातील मंडळ अधिकारी, तलाठी, नगर परिषद कर्मचारी  इत्यादींची असेल. 

या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 चे नियम 11 नुसार, भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदींनुसार दंडनीय, कायदेशीर कारवाईस पात्र राहील.  या आदेशाची अंमलबजावणी दिनांक 20 मे 2020 पासून तात्काळ लागू करण्यात येत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी सर्व विभागप्रमुखांनी जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी – पालकमंत्री

Next Post

कोरोना लढाईत मनोरंजन क्षेत्र मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी

Next Post
कोरोना लढाईत मनोरंजन क्षेत्र मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी

कोरोना लढाईत मनोरंजन क्षेत्र मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo