<
पाचोरा- उपनगराध्यक्ष शरद पाटे यांनी आपल्या आईवडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ वाणी समाजातील विवाहाची 50 वर्ष पूर्ण करणाऱ्या 37 दाम्पत्यांचा कृतज्ञता आणि मातृ पूजन मातृ-पितृ पूजन सोहळा संपन्न झाला. यावेळी 37 आजी-आजोबांचा सत्कार आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते गणेश पूजन करून झाले.यावेळी व्यासपीठावरून अध्यक्षीय भाषण करतांना हा कार्यक्रम म्हणजे संस्कार आणि संस्कृतीचे स्त्रोत असलेले आजी आजोबा यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा कार्यक्रम असून अशा कार्यक्रमांनी समाजात एक सकारात्मक बदल घडून येतील असा विश्वास आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष संजय गोहिल,मुकुंद बिलदीकर,डॉ पवनअग्रवाल, भडगाव पालिकेचे माजी नगराध्यक्ष शशिकांत येवले,गजानन मालपूर,राजेंद्र पाचपुते आदी उपस्थित होते.उपनगराध्यक्ष शरद पाटे यांनी प्रास्ताविक आणि प्रा.राजेंद्र चिंचोले,गजानन मालपुरे, सुनील नेरकर, डॉ. पवन अग्रवाल, राजेंद्र पाचपुते यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीस मार्गदर्शक प्राध्यापक राजेंद्र चिंचोले,डी आर कोतकर,बापू शेंडे,रमेश येवले,अनिल येवले,प्रशांत येवले,भरत शेंडे,,संदीप महालपुरे,विजय सोनजे,अशोक बागड, योगेश येवले,शशिकांत महालपुरे,संगीता येवले,विनोद चिंचोले,उद्धव कोठावदे ,संदीप मोरणकार,दिलीप कोतकर,योगेश येवले,गणेश पाटे,अद्वैत येवले,भरत सिनकर,नितीन ब्राह्मणकर,ललित येवले उपनगराध्यक्ष शरद पाटे आणि संगीता पाटे यांचा सत्कार आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी विवाहाची पन्नास वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वर्ष पूर्ण करणाऱ्या भगवान विठ्ठल पाटे-सुमन भगवान पाटे,रघुनाथ धोंडू सोनजे , विश्वनाथ कालिदास येवले,जगन्नाथ शंकर बहाळकर, वसंत रामकृष्ण वाणी,नथ्थु तानीराम वाणी जनार्दन आनंदा चिंचोले,लक्ष्मण श्रीधर वाणी, गोपाळ त्रंबक अमृतकर, दत्तात्रय त्रंबक अमृतकर, अशोक त्रंबक अमृतकर ,लक्ष्मण इच्छाराम चिंचोले, गणपत रामभाऊ मोराणकर ,पंढरीनाथ त्रंबक सिनकर,पुंडलिक शंकर देव, दत्तात्रय पांडुरंग सिनकर, वसंत पुंडलिक महालपुरे,मधुकर सदाशिव येवले ,रघुनाथ नारायण वाणी यांचेसह 37 दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत के कोतकर यांनी केले तर आभार भालचंद्र पाटे यांनी मानले.